चाळीसगाव : रमेशचंद्र अग्रवाल यांनी आपल्या आयुष्यात सदैव कार्यमग्न राहण्याचा मंत्र दिला. चाळीसगावच्या मातीत रोजगाराची, प्रयोगशीलतेची स्वप्ने फुलवली. समर्पण, सेवा, त्याग याबरोबरच आपली माती आणि माणसांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. सदोदित दुसऱ्यांच्या उत्कर्षाचा विचार त्यांनी केला. आपल्या पेरत्या हातांनी त्यांनी मानवतेची पूजा केली, असा हृद्य संवाद विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी येथे साधला.
गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली गणपती लॉन्स येथे ख्यातनाम उद्योजक व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रमेशचंद्र अग्रवाल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अग्रवाल यांच्या आयुष्यपटावर आधारित ‘आधुनिक विश्वकर्मा’ या चित्रफितीचे प्रकाशन व सादरीकरणही झाले.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रदीप देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष देवकीनंद अग्रवाल, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापकीय बोर्डाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक चाळीसगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले. यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष, युवा उद्योजक योगेश अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत राजेंद्र अग्रवाल, जुगलकिशोर अग्रवाल, अल्केश भारुका, सुशील अग्रवाल, मधूर अग्रवाल यांनी केले. आभार संजय अग्रवाल यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. विजय गर्गे, संगीता देव यांनी केले.
150721\15jal_2_15072021_12.jpg
रमेशचंद्र अग्रवाल यांच्या जीवनगाथेवर आधारीत आधुनिक विश्वकर्मा चित्रफीतीचे प्रकाशन करताना अरुणभाई गुजराथी, सोबत उन्मेष पाटील, मंगेश चव्हाण, उदयसिंग राजपुत, प्रदीप देशमुख, नारायणदास अग्रवाल, आशालता चव्हाण, योगेश अग्रवाल. (छाया : जिजाबराव वाघ)