शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसह मुसाफिरखान्यातील समाजबांधवांसाठी रमजानच्या ‘सहर’ची करतात व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 4:46 PM

मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून शहरातील मस्जिदे-ए- आले इम्रान ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेत गाड्यातील प्रवाशांचा सहरअभावी गाडीमध्ये रोजा चुकू नये याकरिता रेल्वे स्थानक व बसस्थानकावरील प्रवाशांसाठी पहाटे सकाळी दोन ते साडेचार या दरम्यान ‘सहर’ची व्यवस्था करतात. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देमस्जिद-ए-आले इम्रान यंग ग्रुपचा स्तुत्य उपक्रमएक रुपयाही कोणाची मदत नाही, स्वखर्चाने करतात समाजबांधव सहरची सेवा

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून शहरातील मस्जिदे-ए- आले इम्रान ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेत गाड्यातील प्रवाशांचा सहरअभावी गाडीमध्ये रोजा चुकू नये याकरिता रेल्वे स्थानक व बसस्थानकावरील प्रवाशांसाठी पहाटे सकाळी दोन ते साडेचार या दरम्यान ‘सहर’ची व्यवस्था करतात. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अशी सुचली रोजगारांच्या खिदमतची कल्पनामस्जिद-ए-आले इमरान यंग ग्रुपचे युवक गतवर्षी रमजान महिन्यातच रेल्वे प्रवासात होते. रोजे कोणत्याही स्थितीमध्ये अनिवार्य असल्यामुळे ठेवणे भाग आहे. परंतु प्रवासामध्ये असताना पहाटे सहरसाठी जवळ काहीच नसल्यामुळे व सहरच्या वेळेदरम्यान स्थानकावरही गाडी थांबत नसल्यामुळे ग्रुपच्या युवकांना रोजेला मुकावे लागले होते. त्याच वेळेस त्यांनी निश्चय केला की, ज्याप्रमाणे रेल्वे प्रवासात सहरसाठी व्यवस्था नसल्यामुळे आपले रोजे सुटले. अशाच प्रकारे अनेक समाज बांधव प्रवाशांमध्ये असताना त्यांच्याकडेही पहाटे सहरसाठी व्यवस्था नसेल तर त्यांचेही रोजे सुटतील. या कल्पनेतून ग्रुपच्या सदस्यांनी खिदमत म्हणून प्रवाशांसाठी सहर व्यवस्था करण्यास सुरुवात केली.सहरसाठी भुसावळ स्थानकावर ‘इंतजाम’ सोशल मीडियाद्वारे केली पोस्ट शेअर, येतात फोन कॉल्सग्रुपचे सदस्य शेख वसीम, इरफान खान, इम्रान खान, शरीफ शेख, वसीम शेख मुबारक खाटीक सलमान खान (बब्बू) यांनी व सदस्यांनी सोशल मीडियाद्वारे व्हाट्सअपवर फेसबूकवर भुसावळ शहर हे देशातील मध्य स्थानातील असून याठिकाणी पहाटे सहरच्या वेळेमध्ये अनेक प्रवासी गाड्या येत जात असतात ज्या बांधवांनाही रमजानमध्ये सहर साठी व्यवस्था नसेल त्यांनी ग्रुपच्या सदस्यांना सोशल मीडियावर दिलेल्या क्रमांकावर आपली गाडी नंबर, कोच नंबर, बर्थ नंबर, गाडीची भुसावळ स्थानकावर येण्याची वेळ हे टाकावे, भुसावळ स्थानकावर गाडी पोहोचण्याच्या आधीच ग्रुपचे खिदमत करणारे युवक पार्सल घेऊन कोचवर जवळ आधीच उभे असतात. ही पोस्ट संपूर्ण देशभरात अनेक समाज बांधवांनी शेअर केली. या माध्यमातून दिल्ली, कोलकाता, मुंबई, अहमदाबाद, बडोदा, इलाहाबाद, गोरखपूर, नागपूर, इटारसी, भोपाल, सुरत, अक्कलकुवा या शहरातील अनेक जणांनी सोशल मीडियावर दिलेल्या नंबरवर व्हाट्सअप करून आपले माहिती देऊन सहरच्या व्यवस्थेसाठीच्या सूचना केल्या. अशाप्रकारे यंग ग्रुपच्या मुलांनी सोशल मीडियाचा वापर करून व्यवस्था केली.एक रुपयाही कोणाची मदत नाही, स्वखर्चाने करतात समाजबांधव सहरची सेवारात्री तराहवीची नमाज संपल्यानंतर ग्रुपचे जवळपास ५० सदस्य सहरचा इंतजाम खिदमतचा बॅच लावूनमस्जिद-ए-आले इम्रान याठिकाणी रात्रभर सहरच्या स्वयंपाकासाठी तयारीला लागतात. यासाठी त्यांनी समित्या गठित केल्या असून, प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. स्वयंपाकाची टीम, पाणी व्यवस्था, रेल्वेस्थानकावर जाऊन प्रवाशांना पार्सल देण्याची टिम वेगळी. यासाठी ग्रुपचे सदस्य स्वखर्चाने सहरची व्यवस्था करतात. कोणाकडूनही एक रुपयाची मदत घेत नाही. पुण्याच्या भावनेतून व्यवस्था करण्यात येत आहे.रेल्वेस्थानक, बसस्थानक, मुसाफिर खाण्यासाठी व इतर समाज बांधवांसाठीही जेवणाची व्यवस्थाग्रुपच्या सदस्यांनी सहरच्या इंतजामसाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक, मुसाफिरखाना याठिकाणी बॅनर लावून ग्रुपचे सदस्य पाठवून जे जे सहरसाठी इच्छुक असतात. अशा सर्व समाज बांधवांसाठी रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील पार्किंग व्यवस्था ठिकाणी जीआरपी पोलिसांसमोरच्या जागेवर सकाळी तीन ते चार या दरम्यान सहरची व्यवस्था करण्यात येते. तसेच जे इतर समाजाचे समाज बांधव असतील त्यांनाही जेवणासाठी आग्रह करून त्यांनाही जेवणाची व्यवस्था करण्यात येत. यामुळे जातीय सलोखा, एकात्मतेचा संदेशही ते या उपक्रमातून देत आहे.तीनशेपेक्षा जास्त प्रवासी घेतात लाभग्रुपच्या सदस्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली पोस्ट पूर्ण भारतभरात फिरत असून जे कोणीही प्रवासी भुसावळ स्थानकावरून सहरच्या वेळेस प्रवास करत असतात त्यांचे हमखास फोन कॉल्स व सोशल मीडियावर सहरच्या व्यवस्थेचे संदेश येतात. या माध्यमातून दररोज ३०० च्या जवळपास प्रवासी या उपक्रमातून सहर करतात.उपक्रम इतर ठिकाणीसुद्धा व्हावेज्या पद्धतीने भुसावळ येथे मस्जिद-ए-आले इम्रान ग्रुपच्या सदस्यांनी सहरसाठीची व्यवस्था भुसावळ स्थानकावर केलेली आहे असेच उपक्रम देशातील इतर रेल्वेस्थानकावरही व्हावे. जेणेकरून प्रवासादरम्यान कोणत्याही समाज बांधवांचा अनिवार्य असलेले रोजे सुटणार नाही. हा या मागचा उद्देश असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.भुसावळला सहरचा प्रयोग यशस्वीभुसावळ हे मोठे जंक्शन आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या जलद गाड्या थांबतात. थांब्यांची वेळही दहा मिनिटाच्या जवळपास असते. या तुलनेत इतर स्थानकांवर जलद गाड्या थांबत नाही. थांबल्या तरी एक-दोन मिनिटांसाठी थांबतात. यामुळे भुसावळ रेल्वेस्थानकावर सहरची व्यवस्था करणे सहज शक्य होते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ