शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेने वाजणार रणभेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 5:55 PM

जम्मू-काश्मिर विभाजन मुद्यावरुन भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरणाचा प्रयत्न ; विरोधकांमध्ये संभ्रम, भाजपामधील इनकमिंगमुळे समीकरणे बदलणार ; इच्छुकांचा जीव टांगणीला ; वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका

मिलिंद कुलकर्णीकाँग्रेस-राष्टÑवादीच्या यात्रा वर्षभरात खान्देशात येऊन गेल्या; परंतु त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. उलट पक्षातील बंडाळी आणि बेदिलीचे प्रदर्शन घडले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ येत आहे. पाच वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडताना पुढील पाच वर्षांसाठी ते महाजनादेश मागणार आहेत. खान्देशने प्रत्येक निवडणुकीत भाजपला साथ दिली. आता भाजप आणि सरकारने खान्देशला भरघोस देण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीचा आढावा त्यांनी घेतला तरी खान्देशला खूप काही मिळेल, असे म्हणावे लागेल.जम्मू-काश्मिर-लडाख या राज्याच्या विभाजनाचा मास्टरस्ट्रोक मोदी-शहा जोडीने मारल्याने भाजपच्या गोटात ‘फील-गुड’चे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली अशी नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून भाजपमध्ये ‘इनकमिंग’ आणखी वाढण्याची शक्यता आहे.खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक स्थिती चांगली आहे. ११ पैकी ८ मतदारसंघ भाजपकडे असून तेथे प्रत्येक मतदारसंघात दहापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार रांगेत आहेत. त्यामुळे चर्चा होत आहे ती पण, शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघांविषयी. जसे जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. पण आतील गोटानुसार देवकर यांना भाजपने चाळीसगाव मतदारसंघासाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संबंधी कधीही मधूर नव्हते, त्यामुळे भाजप तेथे आक्रमक असतो. तरीही पाटील यांच्याशी टक्कर देण्याएवढा तुल्यबळ उमेदवार भाजपकडे नाही, ही त्यांची कमजोरी आहे. म्हणून राष्टÑवादीतून माजी आमदार दिलीप वाघ यांना ओढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.भाजपला धुळे आणि नंदुरबारमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांची खरी कसोटी तेथे आहे. नवापुरात भरत गावीत यांच्यारुपाने मातब्बर उमेदवार गळाला लागला आहे, तसा उमेदवार धडगाव, साक्री, शिरपूर धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी शोधला जात आहे. काँग्रेस आघाडीतील विद्यमान आमदारांना भाजपमध्ये घेण्याचे प्रस्ताव दिले गेल्याची चर्चा आहे. कुणाल पाटील यांच्याविषयी तर महाजन यांनी जाहीरपणे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेत नेमके काय घडते, याविषयी मोठी उत्कंठा आहे.भाजपमधील इनकमिंग वाढल्यास इच्छुक उमेदवरांची कोंडी होणार असली तरी हे उमेदवार आता बंडखोरीच्या मानसिकतेत नाही. लोकसभा निवडणुकीतील भाजप विजयाची पुनरावृत्ती, नंदुरबार मतदारसंघात निष्ठावंत डॉ.सुहास नटावदकर यांची फसलेली बंडखोरी,लोकप्रिय घोषणांचा भाजपला फायदा होण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार, निष्ठावंत भर निवडणुकीत निष्क्रिय, अलिप्त राहतील. पण बंडखोरी करणार नाही. त्यामुळे काँग्रेस आघाडीला आशा असली तरी त्यांच्याकडे इनकमिंग फार काही वाढेल, असे नाही. याउलट आघाडीचे काही उमेदवार पक्षचिन्हाऐवजी अपक्ष निवडणुकीला पसंती देण्याची शक्यता अधिक आहे. संघटनेतील बेदिली, पक्षाची ध्येय धोरणे, आर्थिक सहाय्य अशा सगळ्या पार्श्वभूमीवर चिन्ह नको, असेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. या चर्चेमुळे मात्र भाजपमधील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. काही उमेदवार तर वर्षभरापासून मोर्चेबांधणी करीत आहेत. मेहनत केल्यावर ऐनवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार तिकीट घेऊन जाणार म्हटल्यावर जीव टांगणीला लागणे स्वाभाविक आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही नावे घेऊन गुगली तर टाकली आहे, विकेट पडते काय, हे कळेलच.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव