ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 15 - जगातील जवळपास 100 देशांमधील संगणक व्यवस्था, यंत्रणांना प्रभावीत करून खळबळ उडविणारा रॅन्समवेअर व्हायरस हल्ला खान्देशातही झाल्याचे समोर आले असून, या हल्ल्याने प्रभावीत झालेल्या एका संस्थेकडे हॅकर्सने प्रभावीत केलेल्या फाईल्स पाहिजे असल्यास 300 डॉलर्सची मागणी केली आहे. 13 मे रोजी दुसरा शनिवार व 14 रोजी रविवारची सुट्टी असल्याने शासकीय कार्यालये, केंद्र सरकारच्या अखत्यारितील कार्यालये, शासकीय कार्यालये बंद होती. शुक्रवारी घुसला व्हायरसधुळे येथील एका संस्थेच्या संगणकात शुक्रवारी रात्रीच व्हायरस घुसला. ही बाब त्याचवेळी लक्षात आले. त्यानंतर हा संगणक नेटवर्कमधून तत्काळ बाहेर काढण्यात आला. तो दुरुस्तीसाठी देण्यात आला.दूरसंचार, केंद्रीय कार्यालयांना सावधानतेची सूचनासायबर हल्ला देशात फारसा प्रभावशाली नसला तरी जिल्हाभरातील काही दूरसंचार संस्थांची कार्यालये, संगणक व्यवस्थांवर कार्यरत केंद्रीय कार्यालयांना सायबर सिक्युरिटी संस्थांनी सावधानतेचा इशारा दिल्याची माहिती मिळाली. ऑनलाईन पैसे जमा करण्याची मागणीसंगणकातील फोटो, पीडीएफ, एक्सेल फाईल्स हॅकर्सनी पासवर्ड टाकून लॉक केले असून त्या फाईल्स पुन्हा पाहिजे असल्यास बीटकॉईन या यंत्रणेच्या माध्यमातून 300 डॉलर जमा करा, असे संगणकाच्या स्क्रीनवरील संदेशात म्हटले आहे. डॉलर जमा करण्याची कार्यवाही ही ऑनलाईनच करायची आहे. त्यासंबंधीचे काउंटडाऊनही स्क्रीनवर दिले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. जळगावात किंवा धुळ्य़ात सायबर हल्ला झाल्यासंबंधीची माहिती उमविच्या संगणक विभागाला मिळाली नाही. परंतु असुरक्षित संगणक हाताळणी, अॅण्टीव्हायरस नसणे किंवा तो अपडेट नसणे अशा कारणांमुळे व्हायरस येतो. -विनोद पाटील, संगणकशास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
खान्देशातही रॅन्समवेअर व्हायरस हल्ला
By admin | Published: May 15, 2017 12:22 PM