जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागात ११ ते १३ जानेवारीदरम्यान रंगतरंग महोत्सव मोठ्या थाटात पार पडला. यात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. नुकतेच स्पर्धेचे निकालही जाहीर करण्यात आले आहे.
मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने दरवर्षी सोळा गुणांवर आधारित रंगतरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. ११ रोजी नर्सरी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी चित्रकला (रंगभरण) स्पर्धा तसेच नर्सरी व ज्युनिअर केजीसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. मंगळवार, १२ जानेवारी रोजी गायन कला, वक्तृत्व स्पर्धा तर १३ रोजी या स्पर्धांमधील निवडक मुलांचे गायन व एकत्र नृत्य या कलांचे प्रत्यक्षात सादरीकरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील व समन्वयिका सविता कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यांनी मारली बाजी
रांगोळी स्पर्धा (नर्सरी)- प्रथम काव्या विसपुते, द्वितीय तीर्थेश महाजन, तृतीय हर्षिका कपिल परदेशी़
चित्रकला स्पर्धा (नर्सरी)- प्रथम निहार जोशी, द्वितीय स्वानंद संदांनशिव, तृतीय भावेश पाटील़
सिनिअर केजी- प्रथम दूर्वा गाजरे, द्वितीय जितेश वाडेकर, तृतीय अथर्व राजपूत़
फॅन्सी ड्रेस स्पर्धा (नर्सरी)- प्रथम तनिष्का विरोध, द्वितीय कार्तिकी पाटील, तृतीय विराज विसावे.
ज्युनिअर केजी- प्रथम सादिया तडवी, द्वितीय सुहानी माळी, तृतीय डिंपल भोळे.
वक्तृत्व स्पर्धा- प्रथम मोहित लक्ष्मीकांत सोनवणे (सिनिअर केजी).
ड्रामा- प्रथम जयस्वी योगेश पवार, द्वितीय अनय अजय डोहळे.
गायन स्पर्धा- प्रथम सर्वेशा जोशी, द्वितीय अर्णिमा महाजन, तृतीय मोहित सोनवणे.
नृत्य स्पर्धा (नर्सरी)- प्रथम देवांश वाणी, द्वितीय देवांग पालवे.
ज्युनिअर केजी- प्रथम पूर्वी वाघले, द्वितीय अर्जित महाजन, तृतीय ज्ञानदा वैद्य.
सिनिअर केजी- प्रथम वरनिका शेगडे, द्वितीय आदित्य बिऱ्हाडे, तृतीय प्रांजल पटाईत, उत्तेजनार्थ अथर्व राजपूत.