शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

चाळीसगावात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमातून रंगली शब्दसुरांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:54 PM

लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली.

ठळक मुद्देकौटुंबिकतेकडून सांस्कृतिकतेकडे नेणाऱ्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसादलाडशाखीय वाणी समाजातर्फे उपक्रम

चाळीसगाव, जि.जळगाव : लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश बागड (मालेगाव) प्रमुख अतिथी होते, तर व्यासपीठावर स्रीरोगतज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर, डॉ.प्रवीण भोकरे, डॉ.महेश वाणी, रवींद्र शिरुडे, नीलेश सोनगिरे, संस्थापक वसंत वाणी, अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव विजय भामरे आदी उपस्थित होते.दिवाळी सण म्हटला की, सर्वत्र रंगीबेरंगी रोषणाई, रांगोळी, पणत्या व फराळ आलेच. याव्यतिरिक्त ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करुन देतो. रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच अगदी मन प्रसन्न होऊन जाते. किशोर गुरव यांनी आपल्या जादूई सुरांनी सवार्ना मंत्रमुग्ध केले तर विविधरंगी कलाविष्कार सादर केलेत,विद्या भोई,गायत्री चौधरी,पवन गुरव आदींनी गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले.'माझे माहेर पंढरी', 'अबीर गुलाल उधळीत रंग', 'आळंदी वंदीन', 'विघ्नेश्वर तू वरदविनायका' यासारख्या गीतांनी दिवाळी पहाट सुरमयी झाली. बहारदार गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भक्तीमय गीताने सर्वांना आनंददायी मेजवानी दिली. यावेळी उपस्थितांना धन्वंतरीची प्रतिमा भेट देण्यात आली.आरोग्याचे जतन या मुख्य हेतूने सण उत्सववादी योजना आपल्या पूर्वजांनी केल्या आहेत, ज्यातला एक म्हणजे दिवाळी असून दिवाळीतील फराळ हा आहार परंपरेचा परिपाक आहे. याचा संबंध खाद्य संस्कृतीशीही असून मात्र खाण्यापिण्याची चंगळ सांभाळायला हवी. वातावरणाला अनुरुप व बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाºया विकृतींना प्रतिबंधक काळजी घ्यायला हवी, असे डॉ.विनोद कोतकर यांनी मार्गदर्शनपर सांगितले तर डॉ.प्रवीण भोकरे यांनी थंडीतले निरोगी वातावरण, त्यात मुबलक धनधान्यातून बलवर्धन करणाºया आहारसेवनाचा विचार पूर्वजांनी केला असून हे स्वाभाविक गुण सर्वांनी अवलंबायला हवे असल्याचे सांगितले.शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा हा विचार प्रत्येकाने करायला हवा.समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह,हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्त्व आदी विकारामागेदेखील दिवाळीतील फराळांमधील साखर व मैदा हे प्रमुख कारण राहिले आहे. आहारात याची प्रमाणशीर काळजी घ्यायला हवी, असे डॉ.भाग्यश्री शिनकर यांनी सांगितले.सूत्रसंचालन कैलास पाखले यांनी, तर आभार प्रा.बी.आर.येवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालचंद्र सोनगिरे, अनिल कोतकर, हिरालाल शिनकर, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, जयवंत कोतकर, सतीश देव, मनोज शिरुडे, रवींद्र अमृतकर ,बी.के.वाणी, रवी अमृतकर, केशव गोल्हार, अशोक गोल्हार, दिलीप येवले, प्रकाश अमृतकर, हरिचंन्द्र पिंगळे, श्रीधर फुलदेवरे, गजानन कोतकर, प्रशांत बागड आदीनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव