लक्षवेधी कलाकृती : आनंदनगरात १८ सदस्यांची सहा तासांची मेहनत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : श्रीराम मंदिर निर्माण तीर्थ क्षेत्र निधी समर्पण समितीतर्फे १५ जानेवारी ते१५ फेब्रुवारी दरम्यान एक संपर्क अभियान सुरू होणार असून या अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील आनंद नगरच्या महिला सदस्यांनी एकत्र येऊन भव्य अशा रांगोळीतून रामजन्म व लंकादहन असे दोन प्रसंग रेखाटले आहेत. १२ बाय ७ फुटाची या रांगोळीचे आनंद नगरातील सभागृहात दुपारी ४ ते ६ प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या कलाकृतीसाठी परिसरातील महिलांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीनंतर शनिवारी दुपारी स्केच तयार करण्यात आले, त्यानंतर रात्री ९ ते २ वाजेपर्यंत ही भव्य रांगोळी रेखाटण्यात आली. यासाठी पंधरा किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. सोमवारीही दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत ही रांगोळी पाहण्यासाठी सभागृह सर्वांसाठी खुले राहणार आहे.
यांनी रेखाटली रांगोळी
कश्मिरा बेहेडे, सारीका बेहेडे, मेघा बियाणी, अर्चना नवाल, संगीता नवाल, राजश्री झुणझुणवाला, दीपा झंवर, सुजाता बेहेडे, सलोनी बेहेडिया, सुरभी नवाल, वैशाली मुंदडा, अर्थ लढ्ढा, इंदू लढ्ढा, रानू काबरा, गिता रावतोळे, उमा झंवर, पुष्पा बेहेडे.