रावेर, जि.जळगाव : रावेर शहरातील रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे ८ ते १२ डिसेंबर दरम्यान ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवर विचारपुष्प गुंफतील.सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ दरम्यान ही व्याख्यानमाला शहरातील सरदार जी.जी.हायस्कूलच्या रंगमंचावर होईल. तब्बल १६ वर्षांची दीर्घ परंपरा या व्याख्यानमालेला लाभली आहे. ही व्याख्यानमाला भवरलाल अॅड.कांताई मल्टिपर्पज, हरेश तोलानी (जळगाव) व ओम सुपर शॉप यांनी प्रायोजित केली आहे.या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ८ डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.प्रा.आर.एस.माळी यांच्या प्रकट मुलाखतीने गुंफले जाणार आहे.दुसरे पुष्प ९ रोजी पुणे येथील व्याख्यात्या अनुराधा प्रभुदेसाई यांचे ‘ऋणानुबंध सैनिकांशी-कारगिल शौर्यगाथा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.१० रोजी ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियाना’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्या ‘स्त्री-काल, आज आणि उद्या’ या विषयावर, दि.११ रोजी मुंबई येथील अश्विनी मयेकर यांच्या ‘पालक आणि मुलांमधील संवाद’ या विषयावर, तर १२ डिसेंबर रोजी राहुल सोलापूरकर यांचे ‘आजच्या युवकांची दशा, स्वातंत्र्य वीरांची दिशा’ या विषयावर या व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफले जाणार आहे.
रावेर येथे शनिवारपासून ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 2:00 PM
रावेर शहरातील रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे ८ ते १२ डिसेंबर दरम्यान ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवर विचारपुष्प गुंफतील.
ठळक मुद्देव्याख्यानमालेला १६ वर्षांची परंपराविविध क्षेत्रातील मान्यवर गुंफतील विचारपुष्पव्याख्यानमालेची सुरुवात होणार माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी यांच्या प्रकट मुलाखतीने