रावसाहेब दानवे यांचा पराभव केल्याशिवाय केसांचा भांग पाडणार नाही : माजी मंत्री अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:34 PM2018-06-15T23:34:18+5:302018-06-15T23:34:18+5:30
प्रत्येकाने आयुष्यात संकल्प केला पाहिजे. केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास आणि मेहनत आवश्यक आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत केल्याशिवाय आपण भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जळगाव शहर काँग्रेसच्या मेळाव्यात दिली.
जळगाव : प्रत्येकाने आयुष्यात संकल्प केला पाहिजे. केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रबळ आत्मविश्वास आणि मेहनत आवश्यक आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत केल्याशिवाय आपण भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जळगाव शहर काँग्रेसच्या मेळाव्यात दिली.
काँग्रेस भवनात शुक्रवारी दुपारी ३ वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जळगावातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी भाजपाकडे देशात केवळ दोन खासदार होते. भाजपाचे नेते ज्यावेळी गावात जायचे त्यावेळी त्यांना कार्यकर्ते मिळायचे नाही. मात्र त्यांनी आम्ही सत्तेवर येणार असा संकल्प त्यांनी केला आणि ते सत्तेत आले. तसाच संकल्प मी देखील केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाख मतांनी पराभूत करीत नाही तोपर्यंत केसांचा भांग पाडणार नाही असा संकल्प केल्याची माहिती त्यांनी दिली. मी केलेला संकल्प आणि २०१९ मध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वाधिक मराठा मतदार असलेल्या सिल्लोड मतदार संघासाठी ज्यावेळी मी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली. त्यावेळी काही लोक हसले होते. मात्र स्वत:चा आत्मविश्वास कायम ठेवत निवडणूक लढलो आणि काही मतांनी पराभूत झालो. नंतर ज्यांनी तिकिट नाकारले त्यांनी मला उमेदवारी दिली आणि आमदार झाल्याचे त्यांनी सांगितले.