जामनेर : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार (शंकरपुरा, ता. जामनेर) येथील तरुणीने शुक्रवारी पोलिसांत दिली. त्यावरून गावातीलच तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
घटस्फोट झालेली पीडिता गेल्या दीड वर्षापासून माहेरी राहत होती. गावातील अतुल सुदाम राठोड याने लग्न करण्याचे आमिष दाखवीत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने तिला गर्भ राहिला. नातेवाइकांना हे समजल्यानंतर त्यांनी अतुल व त्याच्या नातेवाइकांना लग्न करण्याबाबत सांगितले असता अतुलने नकार दिला.
पीडितेच्या तक्रारीवरून अतुल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, सचिन पाटील, अमोल वंजारी, सपना देशमुख तपास करीत आहेत.