रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : तालुक्यात एकूण ४७ गावांना मे महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यात या टंचाईवर मात करण्यासाठी २८ गावांना टँकरने, तर १३ गावांना खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तब्बल एक महिना आचारसंहिता लागू असल्याने कृती आराखड्यात सुचविण्यात आलेली कामे ठप्प पडली. यामुळे तालुक्यातील ५० टक्के गावे पाणीटंचाईत होरपळूून निघाली.तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेली गावेवडगाव प्र.अ, मंगरुळ, पोपटनगर, खोलसर, भोंडणदिगर, धाबे, वडगाव, चहुत्रे, सांगवी, मेहू, टेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, मोहाडी, तरडी, पळासखेडे,कनेरे, खेडीढोक बाभळेनाग, धुळपिंपी, तरवाडे, देवगाव, पिंपळभेरव, लोणी बुद्रूक, लोणीसीम, वाघरावाघरी, लोणी खुर्द गावांना पाणीटंचाई समस्या निर्माण झाली असल्याने या २८ गावांना २० खाजगी तर २ शासकीय टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जामदा, कंकराज, रत्नापिंप्री, बाहुटे, नगाव, महाळपूर या गावांंनी पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असल्याने टँकरची मागणी केली आह.े पंचायत समितीकडून उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अमळनेर विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.तर खाजगी विहीर अधिग्रहित केलेली गावे व विहीर मालकआंबापिंप्री-शेतकरी भिकन सखाराम पाटील, भिलाली-भिकन सखाराम पाटील, महाळपूर-कमलाबाई संतोष पाटील, जिराळी मंदाबाई मोहन करंजे, शेवगे बुद्रूक कंकराज बुडीत क्षेत्रातील विहीर शेळावे खुर्द प्रकाश यादव पाटील, दगडी सबगव्हान रमेश वामन पाटील, चिखलोड खुर्द, पीतांबर कपूरचंद पाटील, नेरपाट, संतोष पुंडलिक पाटील फ, हिरापूर दोधू महारू पाटील, नगाव हिंमत श्रावण पाटील, धाबे राजेंद्र बाबूराव पाटील उडणीदिगर येथे शालीग्राम संतोष पाटील य आदींच्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.टंचाईग्रस्त गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संभाव्य खालील योजना कृती आराखड्यात सुचविण्यात आल्या आहेत. आंबापिंप्री, पिंपळकोठा, मोहाडी, दहीगाव या गावांना तात्पुरता नळ पाणीपुरवठा योजना, मोंढाले प्र.उ., हिवरखेडासीम, मोरफळ, शिवरे, शिरसमनी, वंजारी, लोणीसीम, रताळे, हिरापूर तरवाडे, बाबळेनाग, मोरफळी, विटनेर सावखेडेहोळ, सावखेडेमराठ या गावांना-पूर्ण केलेल्या नळ योजना दुरुस्ती करणे हे सुचविण्यात आले आहे. इंधवे कंकराज, पिंपळभीरव, रत्नापिंप्री, सांगवी पुनगाव, सारवे बुद्रूक, वाघरा वाघरी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे असे सुचविण्यात आले आहे .उडणी दिगर -नळ योजना दुरुस्ती करणे, करमाड बुद्रूक शेवडी खोदणे, कोळपिंप्री -खाजगी विहीर अधिग्रहित करणे, खेडीढोक, धुळपिंप्री येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत आराखड्यात सुचविण्यात आल्या आहेत, अशी माहिती अभियंता संदीप सोनवणे यांनी दिली.तालुक्यातील बोरी म्हसवे या दोन्ही धरणात मृत साठा पाण्याचा शिल्लक आहे. बोरी धरणावर पारोळा शहरासह ४८ गावांच्या सामूहिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे आणि तालुक्यातील सुमारे १३ गावांना टँकरने होणार पाणीपुरवठा होण्यासाठी टँकर बोरी धरणातून भरले जात आहे. भोकरबारी, कंकराज, सावरखेडे, शिरसमनी, इंदासी, खोलसर, लोणी एमआय टॅन्क या लघु प्रकल्पात पाणीच नाही. हे प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत.अजून २ महिने कसे पार पडतील, असा मोठा प्रश्न प्रशासना समोर उभा आहे. पारोळा शहरालाही १३ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरवाशीय यामुळे त्रस्त झाले आहेत. विकतचे थंड पाण्याचे जार घ्यावे लागत आहे.
पारोळा तालुक्यातील ४७ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:08 PM
पारोळा तालुक्यात एकूण ४७ गावांना मे महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
ठळक मुद्दे२८ गावांना टँकरने तर १३ गावांना विहीर अधिग्रहणसहा गावांना टँकर मागणी प्रस्तावआचारसंहितेचा पाणीटंचाईवर मोठा परिणाम