ऑनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 16 - जगातील जवळपास शंभर देशांमधील संगणक व्यवस्था, यंत्रणांना प्रभावीत करून खळबळ उडविणारा रॅन्समवेअर व्हायरस खान्देशातही धुमाकूळ घालत असल्याच्या भीतीनंतर शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी आपले एटीएम बंद ठेवल्याने भुसावळकर कॅशलेस झाले आहेत़ दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात नोटबंदी झाल्यानंतर भुसावळची अर्थव्यवस्था अद्यापही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही़ 24 तास नियमित सुरू असलेले एकही एटीएम शोधूनही सापडणार नाही, असे दुर्दैव शहरवासीयांचे आह़ेशहरातील सर्वच राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे एटीएम गेल्या सहा महिन्यानंतरही सुरळीत सुरू झाले नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह व्यापा:यांचे प्रचंड हाल होत आहेत़ एटीएम नियमित सुरू ठेवण्याबाबत बँकांनी दाखवलेल्या एकूणच उदासीनतेमुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आह़े
‘रॅन्समवेअर’च्या धास्तीने भुसावळकर कॅशलेस
By admin | Published: May 16, 2017 1:01 PM