शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे मंगळवारी राष्ट्रमंदिर टॉक शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 9:42 PM

किशोर चौधरी यांची माहिती : १५ जानेवारीपासून निधी संकलन

जळगाव : जळगाव जिल्हा श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे मंगळवार, १२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्रमंदिर या संकल्पनेवर प्रकाश टाकणा-या राष्ट्रमंदिर टॉक शो चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे जिल्हा कार्यवाहक किशोर चौधरी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे, जिल्हा अभियान प्रमुख देवेंद्र भावसार, प्रतिमा याज्ञिक आदींची उपस्थिती होती.हा टॉक शो सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात होणार असून या शोमध्ये श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (मुंबई), डॉ.यशस्विनी तुपकरी (संभाजीनगर), जळगाव पीपल्स को.ऑप.बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील व डॉ. प्रसन्न पाटील आदींचा सहभाग असेल. या शोचे सूत्रसंचालन अ‍ॅड. सुशील अत्रे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.१५ जानेवारीपासून निधी संकलन अभियानअयोध्येत साकार होणा-या निधी समर्पण अभियानाची सुरूवात १५ जानेवारीपासून होणार आहे. एक महिना हे अभियान राबविण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातही हे अभियान राबविणार असून घरोघरी जावून निधी संकलन केले जाणार आहे़ त्यामुळे वस्ती, गाव, शहर पातळीवर याचे नियोजन करण्यात आले आहे, असे भावसार यांनी सांगितले.शनिवारी संत संमेलनशनिवार, ९ जानेवारी रोजी पांझरापोळ संस्थान येथे संत संमेलन घेण्यात येणार आहे. त्यानंतर १० रोजी शहरातील विविध वस्तीत महिलांनी रामायणातील प्रसंगावर आधारित रांगोळी काढण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शिवतीर्थ मैदानपासून तरूणांची मोटारसायकल रॅली काढण्यात येवून त्या रॅलीचे आकाशवाणी चौकात समारोप केला जाणार आहे.

 

टॅग्स :TempleमंदिरJalgaonजळगाव