कोतवाल यांच्या ‘फ्रॉक, मुलं वाद घालताहेत, शिक्षकाची कैफियत, मी गोष्ट करतो तेव्हाची, ईश्वर, कॉमन मॅन, पाणी खेळवतंय, पाणी, मोनालिसा, बोलू द्यावं कुणालाही कशावरही, मुली, मधल्या सुट्टीत पळून जाणारी मुले’ या कवितांचे प्रभावीपणे अभिवाचन परिवर्तनच्या कलावंतांनी केले.
यामध्ये नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, वर्षा चोरडिया, मंगेश कुलकर्णी, वेदांती बच्छाव यांनी कवितांचे सादरीकरण केले . हर्षल पाटील यांनी निवेदनातून कोतवालांच्या कवितांची वैशिष्ट्ये, त्यांच्या साहित्याचा प्रवास मांडला. कवितांना बासरीच्या स्वरांनी किर्तेश बाविस्कर यांनी रंगत आणली. या कार्यक्रमाची संकल्पना राजू बाविस्कर यांची तर दिग्दर्शक होरीलसिंग राजपूत यांचे होते. प्रकाशयोजना राहुल निंबाळकर यांचे होते. या प्रसंगी वेळी सत्यजीत साळवे, बाळकृष्ण सोनवणे, लेखक चंद्रकांत भंडारी असे साहित्यिक व रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले.