ऑनलाईन लोकमत चोपडा, दि. 17 : तालुक्यातील शेतक:यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कृषीपंपांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे, तो पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी तालुका शेतकरी कृती समिती व विविध शेतकरी संघटनांनी अंकलेश्वर -ब:हाणपूर महामार्गावर 17 रोजी तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेले हे आंदोलन दुपारी दोन वाजेर्पयत सुरू होते. अधिका:यांनी मागण्याबाबत आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शेतक:यांना पूर्वसूचना न देता कृषीपंपांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे, त्याच्या निषेधासाठी व वीज पुरवठा पुर्ववत सुरू करावा या मागणीसाठी तालुका शेतकरी कृती समिती व विविध शेतकरी संघटनांनी रविवारी आंदोलनाचे अस्त्र उपसत महावितरणच्या अधिका:यांकडून वीज कनेक्शन कट करणार नाही असे लेखी आश्वासन मिळत नाही तोंपयर्ंत रास्ता रोको सुरूच राहील असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दुपारी 2 वाजेपयर्ंत रास्तारोको आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, उदय पाटील, नितीन निकम , वजाहत अली काझी यांनी मनोगतातून आंदोलनामागची भूमिका मांडली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील , भाजपाचे प्रकाश पाटील , अॅड. एस. बी. सोनवणे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, शासनाच्यावतीने नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर आणि महावितरणचे उपविभागीय अधिकारी व्ही. बी. सोनवणे आंदोलकांशी चर्चेसाठी घटनास्थळी आले होते.
चोपडय़ात शेतक:यांच्या तब्बल तीन तास रास्ता रोकोने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 6:41 PM
पूर्वसूचना न देता तालुक्यातील शेतक:यांच्या कृषीपंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केल्याने संतप्त शेतक:यांनी रविवारी विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले, त्यामुळे अंकलेश्वर- ब:हाणपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
ठळक मुद्देरास्ता रोकोमुळे अंकलेश्वर- ब:हाणपूर महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगाअधिका:यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तीन तासानंतर आंदोलन मागे