पाळधी, ता. जामनेर : सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात पाळधी शिवारात उन्मळून पडलेले विजेचे खांब अजूनही तशाच अवस्थेत आहे. हे खांब पुन्हा उभारण्याचे सोडून केवळ वीज पुरवठा खंडीत करुन संबंधित अधिकारी मोकळे झाले आहेत. यामुळे मात्र शेतात ये- जा करण्यास अडसर निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.याबाबत वृत्त असे की, पहूर सबस्टेशन वरून तीन वर्षांपूर्वी पिंपळगाव गोलाईत येथील सबस्टेशनला पाळधी मार्गे नवीन विजेचे खांब टाकून वीज पुरवठा करण्यात आला. परंतु मागील तीन वर्षात चार वेळेस या वीज पुरवठयाचे खांब पडले तसेच मागील वर्षी या विजेच्या तारा सुद्धा चोरी गेल्याची घटना घडली होती.आता पुन्हा मागील दोन महिन्यांपासून काही खांब शेतकºयाच्या शेतात व शेत रस्त्यावर पडलेले असल्याने शेतकºयांना शेतात जाण्यासाठी तसेच खताने भरलेली बैलगाडी नेताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे.रस्ता काढतानाकरावी लागते कसरतबºयाच दिवसांपासून हे खांब पडल्याने तारा लोंबकळत आहेत व काही शेतकरी आपले बैल बाधण्यासाठी या तारांचा वापर करत आहेत. दुचाकी धारकांना सुद्धा ताराखालून गाडी काढावी लागत आहे.सुमारे ४० खांब पडलेपाळधी शिवार ते पिंपळगाव गोलाईत दरम्यान सहा किमी अंतरात जवळपास ४० ते ४५ खांब उन्मळून पडलेले आहेत.पहुर, पाळधी , सोनाळे, व पिंपळगाव या गावच्या शेतकºयांना दरवर्षी हे खांब पडण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दरवर्षी पडतात खांबआतापर्यंत प्रत्येक वर्षी तीन- चार वेळेस हे खांब पडलेले आहेत व उभेही केलेले आहेत. परंतु खांब उभे करून सुद्धा पुन्हा पुढील वर्षी ते पहिल्याच वादळात पडतात यावरून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात येतो. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे खांब सुस्थितीत आहेत, येथेच असे का होते हे गोडंबंगाल असल्याचे बोलले जात आहे. तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांना होणारा अडथळा व त्रास कायमस्वरूपी दूर करावा अशी मागणी होत आहे.
पाळधी शिवारात विजेच्या खांबांनी केला ‘रास्तारोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 5:00 PM