चोपडा, जि.जळगाव, दि.28- चोपडा - लासूर रस्त्यावर चोरटय़ांनी झाड आडवे टाकून, दुचाकी अडवून, त्यांच्याजवळील तीन मोबाईल, रोख 300 रूपये असा 7300 रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 27 रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.
कृष्णा तुळशीराम भिल (32,रा. लासूर) यांच्यासह तिघेजण मोटारसायकलने चोपडय़ाहून लासूरकडे जात होते. चौगावजवळील मोहाडी नाल्याच्या पुढे चोरटय़ांनी रस्त्यावर निंबाचे झाड आडवे टाकून दुचाकीस्वारांना अडविले. दुचाकीवर असलेल्या तिघांजवळील मोबाईल व रोख 300 रूपये असा एकूण 7300 रूपयाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. (वार्ताहर)