जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाट्याचे भाव निम्याने कमी होऊन ते ३७५ ते ६२५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. टोमॅटोच्या भावात २०० रुपये प्रतिक्विंटलने घट होऊन लाल टोमॅटो ७०० रुपये प्रतिक्विंटलवरून ५०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भाव कमी झाले आहेत.
या आठवड्यात टोमॅटोचे भाव थेट ३०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले आहेत. कांद्याचे भाव कमी होऊन ते २५० ते ६२५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. भेंडीचे भाव ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी होऊन ते १५००, कारल्याचे भाव १८०० रुपयांवर आले आहेत. या सोबतच गेल्या आठवड्यापासून वांग्याची आवक कमी झाल्याने वांग्याचे भाव वाढायला सुरूवात झाली असून ते १००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.