लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह जिल्हाभरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे एक दिलासादायक चित्र दुसऱ्या दिवशी कायम आहे मात्र, वाढते मृत्यू थांबत नसल्याने चिंता कायम आहे. गेल्या दोन दिवसात एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या नोंदविण्यात येत आहे. शहरात गुरूवारी २२० बाधितांची नोंद झाली तर ३१५ रुग्ण बरे देखील झाले.
गेल्या देान दिवसात ४१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात गंभीर बाब म्हणजे ४० वर्षापेक्षा कमी वयाच्या अनेक रुग्णांचा समावेश आहे. जळगाव शहरात तीन बाधितांचे मृत्यू झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे. शहरात सर्वाधिक २५३५ सक्रिय रुग्ण आहेत. तर चोपड्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटून आता १०७३ वर आली आहे.
अहवाल प्रलंबित
कोरोनाची आरटीपीसीआर तपासणीचे १८८९ अहवाल प्रलंबित आहेत. त्याचा नवीन चाचण्यांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी १९९९ अहवाल प्राप्त झाले. तर १२९६ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. ५६८७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण गेल्या काही दिवसांच्या तुलने कमी येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
असे आहेत रुग्ण
सक्रिय रुग्ण ११३२९
लक्षणे नसलेले ७९६५
लक्षणे असलेले ३३६४
ऑक्सिजनवरील रुग्ण १५०७
अतिदक्षता विभागातील रुग्ण ७७४