लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाºया पिंप्राळा येथील रथोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा लाभली आहे़ मंगळवार, ४ रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी रथोत्सवाला १४२ वर्ष पूर्ण होत आहे़. मंदिर व रथ रंगरंगोटीसह विविध कामे पूर्ण झाली आहे़. रथोत्सवासाठी रथ सज्ज झाला आहे़. भक्तीमय व उल्हासपूर्ण वातावरणात रथोत्सव साजरा करण्यासाठी विठ्ठल मंदिर संस्थान परिश्रम घेत आहे़
सुरेशदादा जैन यांच्याहस्ते महाआरती
सकाळी ७ वाजता पंढरीनाथ विठ्ठलशेठ वाणी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येईल़ यंदा रथाच्या महापूजेचा मान सुरेश मुरलीधर वाणी यांना मिळाला आहे़ त्यांच्याहस्ते सपत्नीक दुपारी ११़३० वाजता रथाची महापूजा करण्यात येईल़ दुपारी १२ वाजता सुरेशदादा जैन यांच्याहस्ते महाआरती करण्यात येणार आहे़ रथोत्सवाच्या महापूजेप्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उपमहापौर ललीत कोल्हे, आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे़
रथोत्सवाची कार्यकारिणी
रथोत्सवासाठी यशस्वितेसाठी विठ्ठल मंदिर संस्थान कार्यकारिणीतील सदस्य परिश्रम घेत असतात़ यात अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष पंढरीनाथ वाणी, चिटणीस अशोक वाणी, सहचिटणीस प्रमोद वाणी, सदस्य संजय वाणी, योगेश वाणी, सुनील वाणी, रामदास वाणी यांचा समावेश आहे़. भजनी मंडळ, टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणी व भजन करून राधा कृष्णाच्या मूर्ती ११़३० वाजता रथावर विराजमान होतात़ यानंतर महापूजा व त्यानंतर महाआरती करण्यात येते़ १२ वाजता सारथी अर्जून, हनुमान, गरूड मूर्ती व त्यापुढे घोडे आरूढ होवून रथ सुशोभित केला जातो़ भजन, गवळणी, अभंग, भक्तीगीतांच्या तालासुरात भक्तीमय वातावरण रथोत्सव साजरा केला जातो़ आता भाविकांना रात्री आठ वाजेपर्यंत विठ्ठलाच्या दर्शनाची सोय झाली आहे़.