आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १ : विजया दशमीच्या निमित्ताने धरणगाव व जामनेर शहरात रावण दहन कार्यक्रम घेण्यात आला. सार्वजनिक उत्सवाची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाला शहरवासियांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.धरणगावात ३२ वर्षांची परंपराजागृती युवक मंडळातर्फे शनिवार ३० रोजी रावण दहनाचा कार्यक्रम झाला. गेल्या ३२ वषार्पासून धरणगाव शहरात ही परंपरा सुरु आहे. प्रमुख पाहुण्यांचा हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, भा.ज.पा.चे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन. पी.एम.पाटील, दिलीप रामू पाटील, बालाजी पतसंस्थेचे चेअरमन मंगलदास भाटीया, भाजपा चे तालुका अध्यक्ष संजय महाजन, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.जामनेरात नगराध्यक्षांच्या हस्ते रावण दहनजामनेर शहरात शनिवारी रात्री ८ वाजता श्रीराम मित्र मंडळातर्फे नगराध्यक्षा साधना गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव टिळेकर, महेंद्र बाविस्कर, जितू पाटील, शिवाजी सोनार, छगन झाल्टे, मनोहर माळी, कल्पना पाटील, रजनी चव्हाण, सैयद मुश्ताक अली उपस्थित होते. रावण दहन कार्यक्रमात मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित भाविकांना मुस्लीम बांधवांनी पाणी वाटप केले.
धरणगाव व जामनेर येथे रावण दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 4:40 PM
विजया दशमीच्या निमित्ताने धरणगाव व जामनेर शहरात रावण दहन कार्यक्रम घेण्यात आला. सार्वजनिक उत्सवाची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाला शहरवासियांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
ठळक मुद्देगेल्या ३२ वषार्पासून धरणगाव शहरात सुरु आहे परंपराजामनेरात नगराध्यक्षांच्या हस्ते रावण दहन मुस्लीम बांधवांनी केले भाविकांना पाणी वाटप