जळगाव : रावेर येथे रविवारी रात्री दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणात परस्परविरोधी दोन तर पोलिसांच्यावतीने एक असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, दंगल का घडली, त्यामागे कोणती शक्ती आहे?, त्याचे कारण काय?, पूर्वनियोजित होती का? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोर्जे सोमवारी तातडीने रावेरात दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.पहिल्या गटातर्फे अशोक प्रल्हाद महाजन (५५रा. शिवाजी चौक, रावेर) यांच्या फिर्यादीवरुन इल्या याकुब चौधरी, मन्सुर इब्राहीम खान, ईस्माईल इब्राहीम खान, मुस्ताक दुंड्या शेख कालू शेख नुसार, शेख इम्रान शेख इलीयास, जमील भांडेवाला, नसिरखान इसाकखान, इरफान खान भिकन खान, इसाक खान इब्राहीम खान उर्फ भुºया, दस्तगरी शेख कालू, शेख मुजाहीद शेख इरफान, शेख अकील शेख सुपडू, आबीद खान इब्राहीम खान, बाबुखान उर्फ शरीफखान भिकन खान, जुबेर खान इसाक खान व त्यांच्यासोबत १५० ते २०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दुसºया गटातर्फे शेख जमील शेख बनेसाहब (५६, रा.रावेर) यांच्या फिर्यादीवरुन सुरेश सोनू शिंदे, गणेश हरचंद महाजन, पिंटू मुक्तानंद दानी, प्रशांत गंगाधर दानी, निलेश यशवंत शिंदे, पवन चिंतामण अस्वार, बापू धनू अस्वार, गणेश जगन्नाथ बारी, श्रीकांत मोहन बारी, भास्कर जगन्नाथ बारी, योगेश चौधरी यांच्यासह १५० ते २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांवर हल्ला, वाहनाची तोडफोड प्रकरणी तिसरा गुन्हादंगल नियंत्रणासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जमावाने दगड, विटा, काचेच्या बाटल्या मारुन जीवघेणा हल्ला केला. तसेच पोलिसांना न जुमानता खाजगी वाहने जाळून तसेच पोलीस वाहनाचेही तोडफोड करत शासकीय मालमत्ताचे नुकसान केले. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार जयवंतराव नाईक यांनी दोन्ही गटाच्या लोकांविरुध्द फिर्याद दिली. त्यात मन्सुर इब्राहीम खान, इब्राहीम खान, मुस्ताक दंड्या, शेख इम्रान शे. इलियास, जमील बरतनवाला, नसिरखान इसाकखान, इरफानखान भिकनखान, इसाकखान इब्राहीम खान उर्फ भुºया, आबीदखान इब्राहीम खान, इस्माईल खान इब्राहीमखान, बाबुखान उर्फ शरीफखान भिकनखान, जुबेरखान इसाकखान, शे.कालू शे.नुरा, दस्तगीर शेख कालू, इल्या याकूब चौधरी, शे.मुजाहीद शेख इरफान, शेख अकील शेख सुपडू तसेच सुरेश सोनू शिंदे, गणेश हरचंद महाजन, पिंटू मुक्तानंद दानी, प्रशांत दाणी, निलेश यशवंत शिंदे, पवन चिंतामण अस्वार, बापू धन अस्वार, गणेश जगन्नाथ बारी, श्रीकांत मोहन बारी, भास्कर जगन्नाथ बारी, राजेंद्र शिंदे (सर्व रा.रावेर) यांच्याविरुध्द जीवे ठार मारणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे तपास करीत आहेत.
रावेर दंगल प्रकरणात तीन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 8:59 PM