रावेर : हगणदरीमुक्त शहराच्या स्पर्धेत असलेल्या रावेर शहरात मॉडेल शौचालयाच्या 24 तास वीज, पाणी, एफएमवरील संगीत व टॉयलेट साबणाच्या सुलभ सोयींमुळे रसलपूर रोड, मंगरूळ दरवाजा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर व आठवडे बाजार पसिरातील हगणदरीमुक्त भागाची पाहणी करून राज्यस्तरीय पथकाने समाधान व्यक्त केले. विशेषत: रावेर शहरात मुद्दाम रात्री मुक्कामी आलेल्या या राज्यस्तरीय पथकाने पहाटे 6.30 वाजेपासून ते सकाळी 11.30 वाजेर्पयत हगणदरीने नेहमी प्रभावित राहणारा भाग आज हगणदरीमुक्त पाहून सुखद अनुभव घेतल्याने केंद्रीय गुणवत्ता पथकाकडून लवकरच तपासणी होण्याचे संकेत दिले. शहरातील रसलपूर रोड, रामटेक, वैकुंठधाम परिसर, मंगरूळ दरवाजा व आठवडे बाजार परिसरात नेहमी हगणदरीचा दरुगधीयुक्त परिसर, हगणदरीमुक्त करण्यासाठी न. पा. प्रशासनाने मॉडेल शौचालयाची सुलभ सेवा उपलब्ध करून देत आजपावेतो घेतलेल्या परिश्रमाचे फलित झाले. नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, जि.प. प्रशासन अधिकारी एम. बी. खांडके, अकोला येथील आशा किरण महिला स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका दुर्गा भाड, सावद्याचे मुख्याधिकारी अशोक बागुल यांच्या राज्यस्तरीय पथकाने शुक्रवारी रात्री शहरात मुक्काम ठोकून पहाटे साडेसहा वाजेपासून हगणदरीमुक्त भागाची पाहणी केली. मुख्याधिकारी राहुल पाटील, बांधकाम अभियंता प्रदीप धनके, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी यांच्या समवेत रसलपूर रोड परिसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर भागातील हगणदरीमुक्त परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मॉडेल शौचालयांसह महात्मा फुले चौक, राजे छत्रपती शिवाजी चौक, कारागीरनगर भागातील 60 ते 70 वैयक्तिक शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी करून लाभार्थीकडून वापरासंबंधी माहिती जाणून घेतली. कमलाबाई अग्रवाल गल्र्स हायस्कूलमध्ये स्वच्छतागृह व शौचालयाची पाहणी करून विद्यार्थिनींशी हगणदरीमुक्तीसंबंधी हितगुज साधले. सोबत नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, दीपक नगरे, सूर्यकांत अग्रवाल, शिरीष वाणी उपस्थित होते.(वार्ताहर)
रावेर शहराला हगणदरीमुक्तीचा बहुमान मिळणार..हगणदरीमुक्त शहराचा बहुमान पटकावण्यासाठी राज्यस्तरीय पथकापाठोपाठ लवकरच केंद्रस्तरीय केंद्रीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून पाहणी होणार असल्याचे संकेत राज्यस्तरीय पथकातील वरिष्ठ अधिका:यांनी दिल्याने केंद्रीय स्तरावरील बहुमान पटकावण्याच्या शहरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.