शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 10:22 PM

यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरब्बी व बागायतीला पिकांना जाणवू लागलाय धोका केळीबागा वाचवण्यासाठी आतापासूनच पाणी कपात करून हजारो केळी खोडं सोडले वाºयावरउत्पादन खर्चही निघणे झाले अवघड

रावेर, जि.जळगाव : तालुक्यात यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली असून, जणुकाही दुष्काळाचे वेध लागल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाळ्याच्या उत्तरार्धातच १५ ते २० फुुटांनी विहिरींंची भूजलपातळी खालावली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आतापासूनच हजार- दोन हजार केळीची खोडांच्या पाण्यात कपात करून हजारो खोडं वाऱ्यावर सोडल्याची विदारक परिस्थिती आहे.रावेर तालुक्यात यावर्षी झालेल्या पर्जन्यमानातील पहिल्या रोहिणी ते आश्लेषा पर्जन्य क्षेत्रापर्यंतच्या निम्मे पर्जन्य नक्षत्रात केवळ ३४ टक्के पर्जन्यमान तीन आठवडे तथा महिनाभराच्या खंडानंतर अनियमितपणे झाले. परिणामी खरीप हंगाम केवळ आॅक्सीजनवर ठेवल्यागत तगला.दरम्यान, दुसºया सत्रातील मघा पर्जन्यनक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचा अर्धशतकी टप्पा पार पडला. खरिपाची खुंटलेली वाढ वाढीस लागण्यासाठी सदरचा पाऊस अनुक ठरला होता, तर तालुक्यातील सुकी, मंगरूळ व आभोडा या मध्यमसिंचन प्रकल्पासह गंगापुरी लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन झालेल्या विसर्गाचे जेमतेम पाणी सुकी, भोकर व नागोई नद्यांमधून वाहून निघाले होते.दरम्यान, खरीपाचा हंगाम ऐन फुल व फलधारणेच्या अवस्थेत असताना पूर्वा पर्जन्यनक्षत्र व उत्तरा नक्षत्राचा पूर्वाध अशा महिनाभराच्या कालखंडानंतर पावसाने २२ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्राच्या उत्तरार्धात रात्री संततधार व दमदार हजेरी लावून फलधारणेतील खरीपाला अमृत संजीवनी दिली होती. या तब्बल महिनाभराच्या कालखंडानंतर झालेल्या पावसाने तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाची सत्तरी पार करून ७१.१४ टक्के पर्जन्यमानाने यंदा कमाल मर्यादा गाठली. १२ पैकी १० पर्जन्यनक्षत्र आटोपूनही तालुक्यात जीवनवाहिन्या ठरलेल्या सुकी, भोकर, नागोई, मात्राण, या नद्यांची अद्यापही घशाशी आलेली कोरड पुन्हारूपी न शमल्याची मोठी शोकांतिका आहे. चिंचाटी व मात्राण लघुसिंचन प्रकल्प अद्यापही सिंचनाची साठी ओलांडू शकली नसल्याचे भीषण आहे.या पर्जन्यमानातील उत्तराच्या उत्तरार्धातच पावसाने धूम ठोकल्याने पडत झडत तगलेला खरीप घटते उत्पन्न देणारा असला तरी, उर्वरित हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्र कोरडेठाक जाण्याची भीती असल्याने आहे. तसेच पितृपक्षातील उन्हाने उन्हाळ्यातील मे हिटच्या तडाख्यालाही लाजवत जबर उष्णता ओकल्याने तालुक्यातील भूजलपातळी आता पावसाळ्यातच तब्बल १५ ते २० फूट खोलवर घसरली असून, आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली आहे.भर पावसाळ्यात विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर खालावल्याने आतापासूनच विहिरींचा टप्पा पध्दतीने उपसा होऊ लागल्याने शेतकरीवर्ग कमालीचा भयभीत झाला आहे. रब्बी व बागायती पिकांची चिंता शेतकरीवर्गाची झोप उडवणारी ठरली आहे. या पावसाळ्यात केलेल्या मृगबहार केळीबागांमधील भविष्यातील भूजलटंचाईचा नियोजन व कृती आराखडा म्हणून तालुक्याच्या पूर्व भागातील खानापूर, चोरवड, निरूळ, पाडळे, वाघोड व कर्जोद शिवारातील केळी उत्पादक शेतकºयांनी आपापल्या भूजल साठ्याच्या व भूजलस्त्रोतांचा वेध घेत कुणी एक हजार तर कुणी दोन हजार केळी बागेतील खोडांच्या पाण्याची कपात करून हजारो खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती दुष्काळाची जणूकाही चाहूल करून देणारी ठरली आहे.तब्बल पाच ते सहा महिन्यांत केळीबागांच्या लागवडीपासून, ठिबक सिंचन, रासायनिक खतांच्या मात्रा, आंतर मशागतीचा खर्च, फर्टीगेशन, न्युट्रीशन यावर केलेला लाखो रूपयांचा खर्च निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त केळीबागा भूजलाअभावी वाºयावर सोडल्याने किमान घटत्या खरीपाचे येणाºया उत्पन्नाचे तेलही गेले अन् लागवडीखालील केळी बागायतीच्या उत्पन्नाचे तूपही गेल्याने शेतकरीवर्ग कमालीचा कर्जाच्या खाईत बुडाल्याची विदारक अवस्था निर्माण झाली आहे.खानापूर येथील ग्रामपंचायत सदस्य भुवनेश्वर महाजन, अनंत भावडू धांडे या शेतकºयांनी त्यांचे प्रत्येकी पाच ते सहा हजार केळी बागेतील एक ते दोन हजार केळीचे खोडं वाºयावर सोडल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर