रावेर, जि.जळगाव : मराठा समाजाच्या यंदाच्या मुक्ताईनगर येथे २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या ठिकाणात बदल करून रावेर येथील शेनाबाई पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात ६ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच या वधू-वर परिचय मेळावा व सामूहिक विवाह समितीच्या अध्यक्षपदी डॉ.सुरेश पाटील यांची, तर सचिवपदी प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली.या समितीच्या कार्याध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष घनश्याम पाटील यांची, तर उपाध्यक्ष म्हणून दत्ता पाटील यांची निवड करण्यात आली.रेशीमबंध या वधू-वर सूचीचे प्रकाशनही या सोहळ्यात करण्यात येणार आहे. बैठकीस माजी अध्यक्ष सी.एस.पाटील, रावेर तालुका मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, राजेंद्र चौधरी, विकास पाटील, योगेश महाजन, बाबूराव पाटील, अंबादास महाजन, शिवाजी येवले, कडू पाटील, जे.के.पाटील, व्ही.व्ही. पाटील, ललित चौधरी, मंडळाचे सचिव वामनराव पाटील, दिलीप पाटील, सचिन पाटील, अॅड.धनराज पाटील, भागवत पाटील, काशिनाथ पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
रावेर तालुका मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा ६ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 3:22 PM
मराठा समाजाच्या यंदाच्या मुक्ताईनगर येथे २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या ठिकाणात बदल करून रावेर येथील शेनाबाई पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात ६ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
ठळक मुद्देवधू-वर परिचय मेळावा व सामूहिक विवाह समितीच्या अध्यक्षपदी डॉ.सुरेश पाटीलपरिचय मेळावा आता मुक्ताईनगर ऐवजी रावेर येथे होणार