रावेर, जि.जळगाव : रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसह तालुक्यातील अन्य १२ मागण्यांसाठी रिपाइंतर्फे रावेर-बºहाणपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले.भुसावळ अतिक्रमण हटाव मोहीमेत अतिक्रमणधारक झोपडपट्टीवासीयांचे विस्थापन करण्याच्या प्रकरणात रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्यावरील दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा व संबंधितांविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.मोरगाव बुद्रूक येथील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी स्मशानभूमीची उपाययोजना करा, वाघोदा येथील पेट्रोल पंप चालकाकडून गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल कर्मचाऱ्यांंविरूध्द कठोर कारवाई करा, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च न करणाºया ग्राम पंचायतीविरूद्ध कठोर कारवाई करा आदी ११ मागण्यांसाठी रिपाइं आठवले गटाचे तालुकाध्यक्ष विकी तायडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, तालुका सचिव चांगो भालेराव, शेखर भालेराव, मनोज सोनवणे, सतीश निकम, भीमराव तायडे, महेंद्र तायडे, अक्षय मशाने, किरण ढिवरे आदींनी रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार विजयकुमार ढगे यांना निवेदन सादर केले.
रावेरला राज्य महामार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 5:40 PM
रावेर , जि.जळगाव : रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसह तालुक्यातील अन्य १२ मागण्यांसाठी ...
ठळक मुद्देरिपाइं आठवले गटाने केले आंदोलनजिल्हाध्यक्ष सूर्यवंशींवरील गुन्हा मागे घेण्याची केली मागणी