चाळीसगाव : शेठ ना. बं. वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे एक ते आठ डिसेंबरदरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वाचन मार्गदर्शन शिबिराचा समारोप वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ.हेमांगी पूर्णपात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.यावेळी प्रा. विमल वाणी (म्हसवाद) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. डॉ. हेमांगी पूर्णपात्रे, प्रा. विमल वाणी, कार्यवाह प्रा. दिपक शुक्ल, राजेंद्र चिमणपुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गीता जयंतीनिमित्त गीता पूजन केले. पाहुण्यांचा परिचय संचालक मधुकर कासार यांनी तर प्रकल्प प्रमुख राजेंद्र चिमणपुरे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका सुनीता कासार यांच्यासह ज्ञानेश्वरी कायस्थ, भूमी यादव, निवृत्ती चौधरी, मिताली हिरे या विद्यार्थ्यांनी शिबिराविषयी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी प्रा. वाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुनीता कासार, संगीता देव, सुनीता घाटे, शुभांगी संन्यासी, तुषार चव्हाण, अरविंद तरटे, विश्वास देशपांडे, ल.वि.पाठक, प्रकाश कुलकर्णी, अण्णा धुमाळ, ज्योती पोतदार, प्रशांत वैद्य, शाम रोकडे, महेश भंडारी उपस्थित होते.