शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

सो़डून दिलेली शिष्यवृत्ती परत मिळवता येणार; ३० जूनपर्यंत मुदत

By अमित महाबळ | Published: June 23, 2024 9:30 PM

३० जून २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अमित महाबळ, जळगाव : शिक्षणातशिष्यवृत्तीचा आधार असतो मात्र, नजरचुकीने अथवा काही कारणांनी हा लाभ कायमस्वरुपी थांबविण्याचा किंवा सोडून देण्याचा पर्याय गेल्या वर्षात काही विद्यार्थ्यांकडून स्वीकारला गेला होता. यावर्षी ही चूक दुरुस्त करण्याची संधी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करणे सुरू आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ‘राइट टू गिव्ह अप’चा टॅब नव्याने उपलब्ध करून देण्यात आला होता. शिष्यवृत्तीचा लाभ कायमस्वरुपी थांबविणे किंवा सोडून देण्यासाठी हा टॅब वापरायचा होता. मात्र, नजरचुकीने अनेकांनी त्याचा वापर केल्याच्या तक्रारी नंतर विद्यार्थ्यांनी व वेगवेगळ्या संघटनांनी केल्या होत्या. याची दखल घेत शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करून घेण्याची सुविधा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. नजरचुकीने ‘राइट टू गिव्ह अप’चा पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या अर्जांवरील कार्यवाही प्राचार्यांच्या लॉग इनमधून होणार आहे. त्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुदतीत अर्ज सादर करा...

नजरचुकीने ‘राइट टू गिव्ह अप’चा पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना आपली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करून घेण्याची संधी आहे. त्यासाठी ३० जूनची मुदत आहे. यासंदर्भात काही अडचण असल्यास सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, महाबळ कॉलनी रस्ता या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती