भडगाव, जि.जळगाव : तालुक्यासाठी सहा कोटी ५३ लाख रुपये दुष्काळी अनुदान तहसीलला प्राप्त झाले आहे. ही पहिल्या टप्प्यातील आहे.शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केल्यानंतर दुष्काळी अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. तालुक्यात दोन टप्प्यात एकूण ३५ हजार शेतकºयांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. भडगाव तहसीलमार्फत अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिरायत क्षेत्रासाठी ६८०० रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार रुपये अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात शेतकºयांना मिळेल, शेतकºयांना यासाठी दोन हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली.तालुक्यात खरीप हंगाम सन २०१८ ला कमी पाऊस झाला. त्यात पाणीटंचाई पाहता शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांवर केलेला शेतकºयांंचा खर्चही निघाला नाही. शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शेतकºयांसह सर्व स्तरातून करण्यात आली. आमदार किशोर पाटील यांनीही भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, असे शासन दरबारी मांडले. सर्व स्थिती पाहता शासनाने भडगाव तालुका दुष्काळी जाहीर केला. दुष्काळी अनुदानाची तालुक्यासाठी तहसिल प्रशासनाने एकूण २५ कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. यापैकी तहसीलला गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यासाठी एकूण ६ कोटी ५३ लाख रुपये अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे.शेतकºयांना दोन टप्प्यात ही रक्कम प्रशासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. अनुदान वाटपाची कार्यवाही, याद्या बनविणे आदी कामे महसूल प्रशासनामार्फत युद्धपातळीवर सुरू आहेत. गावागावात तलाठी कार्यालयात बँक खाती नंबर आदी माहिती देण्यासाठी शेतकरी गर्दी करताना दिसत आहेत.याबाबत तहसीलदार सी.एम.वाघ यांनी तालुक्यातील तलाठ्यांची बैठक घेतली. शेतकºयांच्या बँक खात्यासह याद्या बनविणे. याद्या तत्काळ तहसीलला अनुदान वाटप कामासाठी जमा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. शेतकºयांनी तालुक्यातील गावांच्या संबंधित तलाठ्यांकडे तत्काळ बँक खाती नंबर आदी जमा करावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
भडगावसाठी साडेसहा कोटी दुष्काळी अनुदान प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 4:18 PM
भडगाव तालुक्यासाठी सहा कोटी ५३ लाख रुपये दुष्काळी अनुदान तहसीलला प्राप्त झाले आहे. ही पहिल्या टप्प्यातील आहे.
ठळक मुद्दे३५ हजार शेतकऱ्यांंना मिळणार लाभदोन टप्प्यात शेतकºयांना मिळणार अनुदानाचा लाभशेतकºयांनी तलाठ्यांकडे बँक खाती क्रमांक द्यावेत