किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील गुलाबवाडीतील पाणीपुरवठा योजनेच्या क्षारयुक्त असलेल्या कूपनलिकेचा भूजल स्त्रोत दोन दिवसांपूर्वी आटला, तर त्या क्षारयुक्त कूपनलिकेचा पर्याय म्हणून विहीर अधिग्रहण करण्याच्या तहसीलदारांच्या अध्यादेशाकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.मंगळवारी सायंकाळपासून गुलाबवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. सातपुड्याच्या कुशीतील गुलाबवाडी गावाला गत काही वर्षापासून नळ पाणीपुरवठा योजनेच्या कूपनलिकेवरून नळ पाणीपुरवठा केला जात होता. मात्र सदर कूपनलिका क्षारयुक्त असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला अपायकारक असल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ झाली. यामुळे या कूपनलिकेऐवजी माजी उपसरपंच पोपट गुलाब पवार यांची गावालगतच्या शेतातील विहीर अधिग्रहण करण्याचे आदेश तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी १४ मे रोजी पारीत केले होते.मात्र तब्बल आठवडा लोटला तरी गटविकास अधिकारी एच.एन.तडवी यांनी उभय ग्राम पंचायतींच्या ग्रामसेवकाला सदर आदेश अग्रेषित करण्याच्या कागदी घोडे नाचवण्या पलीकडे प्रत्यक्ष विहीर अधिग्रहण करण्याच्या कारवाईकडे पाठ फिरवली. पाणीटंचाई व दुष्काळाच्या अनुषंगाने शासन गंभीर होऊन युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असताना मात्र उभय ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस.व्ही.चौधरी यांनी सदर विहीर अधिग्रहणाच्या तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली केली. तब्बल आठ दिवस लोटल्यानंतरही विहीर अधिग्रहण झाली नसताना मात्र त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एच.एन.तडवी यांनीही तेवढाच हलगर्जीपणा केल्याने उभय ग्रामस्थांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासाठी ना अधिग्रहीत विहीर, ना कूपनलिका असा एकही भूजलस्त्रोत अस्तित्वात नसल्याने उभय ग्रामस्थ मंगळवारी दुपारपासून वाºयावर सोडल्यासारखी स्थिती झाली आहे.विहीर अधिग्रहणासंबंधी ‘लोकमत’ने माहिती जाणून घेतली असता तालुका प्रशासनाने आपल्या शेतातील विहीर अधिग्रहण केल्यासंबंधी अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारची सूचना पोपट गुलाब पवार यांना दिली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अधिग्रहण करत असलेल्या विहिरीचा भूजल साठ्याचा उपसा एक ते दीड तासात होणारा असून, नळ पाणीपुरवठा योजनेच्या उंच जलकुंभावर पाणीपुरवठा करणारा विहिरीवरील सक्षम वीज मोटारपंप नसल्याचे वास्तव उभय शेतकरी पोपट पवार यांनी उघड केले आहे.परिणामी आज क्षारयुक्त कूपनलिकेचा बोजवारा उडाला असताना व अधिग्रहण होणाºया विहिरीचा पाणीपुरवठा सक्षम नसल्याची बाब पाणीटंचाईची दाहकता तीव्र असल्याचे अधोरेखित करणारी आहे.या गावासाठी आदिवासी विकास योजनेंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र दुष्काळ व पाणीटंचाई निर्र्मूलनासाठी आचारसंहिता शिथील करण्यात आली आहे. असे असताना गावात नवीन नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात का दिरंगाई केली जात आहे? याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.यासंबंधी ग्रामसेवक एस.व्ही.चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल तर थेट स्विच आॅफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही.‘आता क्षारयुक्त असलेल्या कूपनलिकेचा भूजलस्त्रोत आटला. तसेच वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये अधिग्रहीत झालेल्या विहिरीचे प्रत्यक्षात अधिग्रहण झाले नसल्याने तीव्र पाणीटंचाईत आदिवासी बांधव वाºयावर सोडण्यात आल्यासारखे झाले आहेत. ही बाब प्रशासन संवेदनशून्य असल्याचे प्रचिती आणून देणारे ठरले आहे.-लक्ष्मण पवार, गुलाबवाडी, ता.रावेर
रावेर तालुक्यातील गुलाबवाडीतील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 5:39 PM
सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील गुलाबवाडीतील पाणीपुरवठा योजनेच्या क्षारयुक्त असलेल्या कूपनलिकेचा भूजल स्त्रोत दोन दिवसांपूर्वी आटला, तर त्या क्षारयुक्त कूपनलिकेचा पर्याय म्हणून विहीर अधिग्रहण करण्याच्या तहसीलदारांच्या अध्यादेशाकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
ठळक मुद्देपाणीपुरवठ्यासाठी ना क्षारयुक्त कूपनलिका ना अधिग्रहीत विहीरग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी वाऱ्यावर