पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील धाबे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत 'वॉटर बेल' उपक्रम, 'बच्चा भेळ पार्टी', 'बाजरीची खिचडी' व शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा साडीचोडी देवून सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे होत्या. प्रमुख पाहुणे शालेय पोषण आहार अधिक्षिका प्रीती पवार, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी तसेच शेळावे केंद्रप्रमुख जितेंद्र पवार उपस्थित होते.सुरुवातीला मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी 'वॉटर बेल' ही संकल्पना स्पष्ट केली. ज्येष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील, क्षत्रिय समाजाचे कार्यकर्ते अनिल पन्नालालसा खत्री यांनी शाळेतील सर्व ५७ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीच्या थर्मासयुक्त पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत .दर १५ दिवसातून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराव्यतिरिक्त ‘बच्चा भेळ पार्टी'ही देण्यात येते. त्याचेही आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी स्वयंपाकीण व मदतनीस यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल साडीचोळी भेट दिल्या.यावेळी दाते संगीता क्षत्रिय व पराग क्षत्रिय उपस्थित होते. सूत्रसंचालन मनवंत साळुंखे व आभार प्रदर्शन गुणवंत पाटील यांनी केले. यावेळी डॉ.विजय वंजारी उपस्थित होते. उत्रड शाळेचे मुख्याध्यापक भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले.
पारोळा तालुक्यातील धाबे येथील शाळेत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 4:12 PM
धाबे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत 'वॉटर बेल' उपक्रम, 'बच्चा भेळ पार्टी', 'बाजरीची खिचडी' व शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा साडीचोडी देवून सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देशालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा साडीचोडी देवून सत्कारशाळेतील सर्व ५७ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीच्या थर्मासयुक्त पाण्याच्या बाटल्या उपलब्ध