जळगाव : तो गुजराथी ती सिंधी पण प्रेमाला ना प्रांत कळतो ना भाषा. प्रेमाला कळतात त्या फक्त भावना. दोघेही इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स करताना प्रेमात पडले. घरी सांगितले पण संस्कृतीचा मिलाफ नाही म्हणून घरचेही विरोधात उभे ठाकले. त्यांनी वर्षभर वाट पाहिली पण अखेरीस कुटुंब तयार झाले आणि थाटामाटात लग्न लागले ही कहाणी आहे ती व्यापारी हर्ष लोटवाला आणि प्रियांका आसवानी- लोटवाला यांची.
हर्ष हे गुजराथी समुदायातून येतात. आता त्यांचे दाणा बाजारात दुकान आहे. ते व्यापारी असले तरी त्यांनी जळगावमधील एका प्रख्यात इन्स्टिट्यूटमधून इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स केला आहे. तेथे शिकत असतानांच त्यांची प्रियांका यांच्याशी झाली. पहिल्याच भेटीत हर्र्ष यांना आपल्या वर्गातील ही मुलगी पसंत होती. पण काही काळाने मैत्री झाली. नंतर हर्ष यांनी प्रियांका यांना विचारले. त्यांनीही होकार दर्शवला. त्यांची ही प्रेमकहाणी लग्नाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहचली. मात्र तेथे खरा अडसर होता. हर्ष यांना आपल्या कुटुंबाला तयार करण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाही. लोटवाला कुटुंबाने त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.
वर्षभरानंतर झाले लग्न
आपापल्या घरी सांगितले. लोटवाला तयार झाले.पण आसवानी यांना हे मान्य नव्हते. प्रियांका आपल्या परिवाराचा विरोध सहन केला. मात्र लग्न करेन तर हर्षसोबतच हा त्यांचा निर्णय होता. दोघांनीही त्यांच्या कुटुंबाची समजुत घातली. त्यानंतर प्रियांका यांचे कुटुंब तयार झाले. एका वर्षाने थाटामाटात दोघांचेही लग्न लावण्यात आले.
आधी विरोध मग झाले कुटुंबीय तयार
दोघांनी आपापल्या घरी सांगितले. लोटवाला तयार झाले.पण आसवानी यांना हे मान्य नव्हते. प्रियांका आपल्या परिवाराचा विरोध सहन केला. मात्र लग्न करेन तर हर्षसोबतच हा त्यांचा निर्णय होता. दोघांनीही त्यांच्या कुटुंबाची समजुत घातली. त्यानंतर प्रियांका यांचे कुटुंब तयार झाले. एका वर्षाने थाटामाटात दोघांचेही लग्न लावण्यात आले.
संसारावर उमलली दोन फुले
हर्ष आणि प्रियांका यांचे लग्न १६ मे २०१० रोजी दोन्ही कुटुंबांच्या साक्षीने आणि सहमतीने झाले. लग्नानंतर या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सध्या हर्ष हे दाणा बाजारातील आपले किराणा दुकान सांभाळतात. तर प्रियांका या गृहिणी आहेत. त्यांनी लोटवाला यांचे संपुर्र्ण कुटुंब सांभाळतात आहे.