जळगाव : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची माहिती भरल्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकाºयांनी जि.प.सीईओ यांना सादर केला आहे. त्यात संबधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी केली आहे. दरम्यान, बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याचे सांगत औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता १९ रोजी कामकाज होणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रिया शासनाने यावर्षी राबविली. त्यात सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी जिल्हाभरातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी चुकीची माहिती भरली होती. या प्रकरणी शासनाच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले होते. केंद्रप्रमुखांमार्फत ही चौकशी करण्यात आली. त्यात जामनेर व चाळीसगाव वगळता अन्य तालुक्यातील सुमारे ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे समोर आले होते.जामनेर व चाळीसगाव गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती सादर केल्यानंतर एकत्रित अहवाल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत सीईओ यांना सादर करण्यात आला. त्यात शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार संबधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस करण्यात आली.दरम्यान, शिक्षक बदलीत अन्याय झाल्याची तक्रार करीत तब्बल ४२ जणांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेवर मंगळवार १२ रोजी उच्च न्यायालयात कामकाज झाले. शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी शासनातर्फे शपथपत्र सादर केले. या प्रकरणी आता १९ रोजी कामकाज होणार आहे.
जळगावातील ‘त्या’ शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 9:17 PM
जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची माहिती भरल्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकाºयांनी जि.प.सीईओ यांना सादर केला आहे. त्यात संबधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी केली आहे.
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केले शपथपत्र१९ रोजी खंडपीठात कामकाजकेंद्रप्रमुखांमार्फत झाली होती चौकशी