जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आवर घालण्यासाठी प्रशासनाने ट्रेस ट्रीट आणि टेस्ट अशी त्रिसुत्री अंमलात आणली आहे. त्याच रुग्णशोध मोहिमेचा भाग म्हणून बुधवारी जिल्हाभरात तब्बल ११ हजार २९९ चाचण्या करण्यात आल्या . गेल्या वर्षभरात एवढ्या चाचण्या एकाच दिवसात करण्यात आल्या नव्हत्या. त्यात आरटीपीसीआर चाच्यात १३४८ एवढ्याच नियमित करण्यात आल्या आहेत. मात्र रॅपीड अँटीजेन चाचण्या तब्बल ९ हजार ९५१ एवढ्या करण्यात आल्या.
त्यातून दिवसभरात ११३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात जवळपास दहा हजार अँटीजेन चाचण्यांमधून फक्त ४०० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यात चोपडा तालुका आणि जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतांना दिसून येत नाही. जळगाव शहरात २८३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर चोपडा तालुक्यात २७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला तर ९९६ जण बरे झाले आहेत.