जळगाव : शालेय पोषण आहाराच्या तांदळाच्या पुरवठ्यात गैरव्यवहार होत असल्याचे उघड झाल्यानंतर अहवाल देऊन आठ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तरीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र असून या प्रकरणात पुरवठादार गुनिना कमर्शियल या पुरवठादारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी केली आहे़सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांना दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की, शहरातील नंदिनीबाई विद्यालयाला पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्यादी मालाची तपासणी केली होती. यावेळी प्रत्येक गोण्यांचे वजन हे कमी भरले होते. यासह पुरवठादाराने वजन काटाही पुरविला नव्हता, ओळखपत्र नव्हते, पाककृती ची अमंलबजावणी केली जात नाही, यासह अनेक अटी शर्थींचे उल्लंघन केले असल्याचे गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी अहवालाल म्हटले आहे. यासह या अहवालाच्या आधारावर संबधित ठेकेदारास आठ दिवसात म्हणणे सादर करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करून, काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे़
पोषण आहार गैरव्यवहाराची फाईल पुन्हा अडकली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:24 PM