जळगाव- दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत १२ जणांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, कारवाई करताना काही विक्रेत्यांनी दंडांची रक्कम भरण्यास नकार देत वाद घातल्याचा प्रकारही मंगळवारी दाणाबाजारात दोन वाजेच्या सुमारास घडला़प्लॅस्टिक बंदी कारवाईची धडक मोहिम मनपाकडून सोमवारपासून राबविण्यास सुरूवात झाली़ पहिल्याच दिवशी १९ विक्रेत्यांवर कारवाई करून ९५ हजारांचा दंड वसूल केला़ तर प्लॅस्टिक पिशव्या वापरू नये याबाबत विक्रेते तसेच उद्योजकांना सुचना करण्यात आल्या होत्या़ अन् ही कारवाई मंगळवापासून सक्त करण्यात येईल असेही कळविण्यात आले होते़ त्यानुसार मंगळवारी सकाळीच आरोग्य विभागाच्या पथकाकडून धाडसत्र सुरू करत दुकानांची, प्लॅस्टिक उत्पादन तयार करणाºया कंपन्यांची तपासणी करण्यात आली़ शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील दिनेश एंटरप्रायझेस या प्लॅस्टिक कंपनीत आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी तपासणी करत प्लॅस्टिक ग्लास व साहित्य जप्त केले़ त्यानंतर मालकास पाच हजार रूपयांचा दंड करण्यात आला़यांच्यावरही झाली कारवाईविसनजीनगरातील मयुर ट्रेडर्स, फ्रुट गल्लीतील दिनेश भालचंद्र केसवाणी, नवीपेठेतील कमल चहा, नवरंग चहा, युनिक, सुरेश कलेक्शन, किरण चहा, गिता होजीअरी व एस ३ यांच्यासह भवानी पेठेतील विक्रेत्यावर कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला़
जळगावात प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या १२ विक्रेत्यांकडून ६० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 8:38 PM
दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत १२ जणांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
ठळक मुद्देजळगाव महापालिकेची प्लॅस्टिक विरोधात मोहिममनपा कर्मचाºयांसोबत विक्रेत्यांनी घातला वादउत्पादक व विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा