जळगाव : पोलीस दलातर्फे राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली़ सकाळपासून कारवाईसाठी शहर व जिल्हा वाहतूक शाखेचे प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा हेल्मेटधारी पथके कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होत़े यात हेल्मेट तसेच सीटबेल्ट न लावणा:य 318 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ कारवाईत पथकाने 60 हजार 600रूपयांचा दंड वसूल केला आह़े राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या गंभीर विषयावर उपाययोजना म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यमार्गावर हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीचा निर्णय घेतला होता़ हेल्मेट व सीटबेल्टबाबत गेल्या आठवडय़ापासून शहर वाहतूक शाखेतर्फे तर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे ग्रामीण भागात जनजागृती केली जात आह़े त्यानंतर शुक्रवारी पोलीस विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला़अनेकांनी हेल्मेटसाठी गाठले दुकानकारवाईच्या भितीने अनेकांनी आज अडगळीतील हेल्मेट बाहेर काढले. तसेच काहींनी कारवाईच्या धाकाने हेल्मेट खरेदीसाठी दुकानांवर गर्दी केली़ अनेकांनी आपापल्या सोयीनुसार हेल्मेट विकत घेतले. जळगाव-औरंगाबाद राज्यमार्गालगत चार ते पाच हेल्मेट विक्रेत्यांनी दुकान थाटली होती़ शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी सकाळी नऊ वाजेपासूनच सीटबेल्ट व हेल्मेट सक्तीच्या कारवाईला सुरवात केली़ महामार्गावर ठिकठिकाणी हेल्मेटधारी पथकेशहर वाहतूक शाखा विभागाचे पाच पथक अंजिठा चौफूली, शासकीय आयटीआय, आकाशवाणी चौफुली, गुजराल पेट्रोलपंप, कालिंकामात चौफुली आदी ठिकाणी तर जिल्हा वाहतूक शाखेचे पाच पथक जिल्ह्यातील विविध ठिकाणी कारवाईसाठी तैनात होते. पथकातील कर्मचा:यांना पोलीस विभागाकडून विशेष हेल्मेट देण्यात आले होत़े वाहनधारकांनी शोधल्या चोर वाटाराष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यमार्गावर हेल्मेट व सीटबेल्टबाबत कारवाई करण्यात येणार आह़े मात्र कारवाईच्या धाकाने काही नागरिकांनी शहरात प्रवास करतानाही हेल्मेट परिधान केले होत़े राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना हेल्मेट व सीटबेल्टच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेकांनी महामार्गलगत कॉलन्या वसाहतींमधील पर्यायी रस्त्यांचा वापर केला़ एकता रिटेलतर्फे शहरात हेल्मेटवर जनजागृतीएकता रिटेल पतसंस्थेतर्फे हेल्मेट सक्ती नव्हे मनाने असा हेल्मेटविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आह़े या अभियानाचा 17 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला़ अध्यक्ष ललित बरडिया, उपाध्यक्ष घन:श्यामदास अडवाणी, माजी अध्यक्ष अनिल कांकरिया, प्रदीप खिवसरा, सीईओ प्रणिता कोलते, विवेकानंद सिन्हा उपस्थित होत़े 19 पर्यत चालणा:या या अभियानात हेल्मेट विषयीचे प्रतिनिधी प्रात्यक्षिक व महत्वपूर्ण माहिती देणार आह़े तसेच चांगल्या गुणवत्तेचे हेल्मेट 10 टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आह़े पाच ते सहा वर्षापासून हेल्मेटचा वापर करणा:या तरूण पटेल या तरूणाचा यावेळी सत्कार करण्यात आला़ सूत्रसंचालन व आभार शब्बीर भावनगरवाला यांनी केल़े
318 वाहनचालकांकडून 60 हजार रूपयांचा दंड वसूल
By admin | Published: February 18, 2017 12:57 AM