भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागात रेल्वेने विनातिकीट, अनियमित यात्रा, अनधिकृत फेरीवाले, विनाबुक सामान यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या तपासणी मोहिमे दरम्यान २ कोटी ९५ लाख ९१ हजार २६७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार व सिनीयर डीसीएम आर. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे पासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. १ ते १९ मे दरम्यान जवळपास ४७ हजार ८८८ प्रकरणांमध्ये २ कोटी ९५लाख ९१ हजार २६७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जो मागील वर्षी याच काळात २४ हजार ५५१ प्रकरणात १ कोटी ४५ लाख ३५ हजार ७८२ रुपये इतका होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ९५.१ टक्के प्रकरणे तर १०३.६ टक्के अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.या मोहिमेत भुसावळ विभागाचे चलतिकीट निरीक्षक विनय ओझा यांनी १० रोजी केलेल्या कारवाईत २ लाख ३५हजार १३० रुपयांचा दंड वसूल करण्याची उल्लेखनिय कारवाई केली. या कारवाईबद्दल डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.दरम्यान, भुसावळ विभागात विविध ठिकाणी अचानक ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशा प्रवाशांनी रेल्वे प्रवासात योग्य तिकीट काढून प्रवास करावा. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटी ९६ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 4:34 PM
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वेने विनातिकीट, अनधिकृत फेरीवाले, विनाबुक सामान यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या तपासणी मोहिमे दरम्यान २ कोटी ९५ लाख ९१ हजार २६७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ठळक मुद्देतीन आठवड्यात ४८ हजार प्रकरणांमध्ये दंड आकारणीगेल्या वर्षाच्या तुलनेत दंड अधिक वसूलवसुलीच्या टक्केवारीतही लक्षणीय वाढविविध ठिकाणी अचानक ही मोहीम राबविणार