जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केल्याने रक्तदान शिबिरांवर गंडांतर आले असून त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला रक्ताची गरज भासली तर कमी पडू नये, यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. मात्र ३१ मार्चपर्यंत पुरेल एवढा रक्तसाठा असल्याची माहिती रेडक्रॉसतर्फे देण्यात आली.कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी आयोजित केलेली रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास काय करणार? असा सवाल काही सामाजिक संस्थांनी उपस्थित केला होता. काही इच्छुक रक्तदात्यांनी रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.दरम्यान, याबाबत रेडक्रॉसशी संपर्क साधला असता, ३१ मार्चपर्यंत पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध आहे. सर्व रक्तगटांचे पुरेसे रक्त सध्यातरी उपलब्ध आहे. मात्र एखाद्या गटाचा रक्तसाठा कमी झाल्याचे दिसून आल्यास आम्ही इच्छुक रक्तदात्यांशी तात्काळ संपर्क करून रक्तदान करवून घेतो, असे रेडक्रॉसच्या उज्ज्वला वर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
रेडक्रॉसकडे ३१पर्यंत पुरेल एवढा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 8:34 PM