शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

कार्डात वाचन छंदाचे प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:04 AM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुुभेच्छा कार्ड या सदरात लिहिताहेत जळगाव येथील अभ्यासक जयंत पाटील...

१९८७ ला स्क्रिन प्रिंटींग सुरू झालेले. त्याच माध्यमातून या कार्डाचे प्रिंटींग झाले आहे. या कार्डात माझ्या वाचन छंदाचे अधिक ठळक प्रतिबिंब पडले आहे. विंदा करंदीकर यांच्या ललित लेखनाचे पुस्तक ‘स्पर्शाची पालवी’ यातून हा मजकूर घेतला आहे. घराचा दिंडी दरवाजा उघडून सुखाची वाट पाहणाऱ्या माणसाला सुख कधीच भेटणार नाही. गोकुळातल्या कृष्णाप्रमाणे सुखालाही सामान्य गोष्टींचे बुरखे पांघरून तुमच्या नकळत संचार करणे अधिक आवडते. त्याची पर्वा न करता आराम खुर्चीत पडा. तुमच्या घराच्या फुटक्या कौलांतून पडणाºया कनडश्याला धरून ते तुमच्या पायाशी केव्हा खेळू लागेल ते तुम्हाला समजणारही नाही. शुभेच्छा देताना मी म्हटलं आहे, ‘अशा सुखाचा एक अर्धा क्षणही तुम्हाला असा मिळो की, त्याच्या स्पर्शानी तुमचे अख्खे १९८७ सुखाने वाकून जावे...’मराठीत ललित लेखनाचा प्रवाह काहीसा चिंचोळा राहिला आहे. पण गुजगोष्टी तसेच निबंधाच्या तोकड्या चौकटीतून बाहेर पडून खुपच मुक्त झाला आहे. ललित लेखन हे जगण्याचा हात धरुन सोबत चालत असते. विंदा मंडईतून भोपळा आणतानाही असा आणतात की, जणू नोबेल प्राइस आणत आहेत.या कार्डाला प्रतिक्रिया देताना माझे एक ज्येष्ठ स्रेही म्हणतात, ‘सामान्यातून असामान्यत्वाकडे जाणारी सुखाची चोर पावलं आज उंच नि बंद दरवाजे पाहून स्वत: दु:खाचे उसासे टाकीत आहेत. कदाचित दार उघडं सापडलं तरी आतल्या चकाकणाºया वस्तूत त्याचा जीव गुदमरतो. सुख म्हणजे हे सगळं? या आतल्या माणसांना निस्पृह एक क्षणदेखील बघायला तयार नाहीत! या अशा क्षणात मी सामावलेला आहे, हे यांना का बरं कळत नाही! तुम्हाला या क्षणाचा साक्षात्कार झालेला आहे. तो सतत होत रहावा ही इच्छा.माझ्या भावना व्यक्त होतील अशी द.भा.घामणस्कर यांची कविता‘मी चराचराशी निगडीत’‘प्रेम करणं ही माझीउपजत पवित्र प्रेरणा आहे.मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर,आकाशावर, उन्हावर, चांदण्यावर आणिमाणसांवरदेखील. मला ऐकायचीनाहीत म्हणूनच तुमच्याभयभित मनाची प्रेम न करण्याची कारणे,मला ऐकू येत नाही तुमचीहलक्या आवाजातील कुजबुज,मी नाकारतो तुमचा मौल्यवान टेपरेकॉर्डरमाझ्याविरूद्ध उच्चारलेला हरेक शब्द मला पोहचवणारा...मी फिरेन संवादत, कधी जवळच्या झाडाशी,कधी दूरच्या मेघाशी,एकटेपणा संपलेलामी एक पुणात्मा आहे...मी सर्व चराचराशी निगडित...सूर्यास्त पाहताना मीही होता निस्तेज,सांजवताना काळाभोर हळूहळू मी नष्ट होतोरात्रीच्या अंधारात आणि उगवतोनवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा...-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव