ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.27- दोन मुलांसह प्रियकरासोबत पलायन केलेली विवाहिता शनिवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाली, मात्र पती व सासुने विनंती करुनही तिने पुन्हा घरी येण्यास नकार दिला. प्रियकरासोबतच राहण्यावर ठाम असल्याने पती व सासूला माघारी फिरावे लागले. प्रियकरानेही तिचा दोन्ही मुलांसह स्विकार केला.
यावल येथील दोन मुलांची आई व तेथीलच अविवाहित तरुण पंधरा दिवसापूर्वी यावल येथून जळगावला आले होते व बसस्थानकातून दोघंही रफूचक्कर झाले होते. याप्रकरणी विवाहितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. नंतर ही तक्रार शून्य क्रमांकाने यावल पोलीस स्टेशनला वर्ग झाली होती.