अमळनेर : पंढरपूर येथे अमळनेरकर महाराजांच्या मठात द्विशताब्दी महोत्सवाची सांगता झाली. यानिमित्ताने सद्गुरू सखाराम महाराज यांची परंपरा तसेच भगवान श्री विठ्ठलाची नित्योपचार सेवेसह विविध विषयांची माहिती असलेले ‘सखास्मृतिगंध’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी हेमंतशास्त्री धर्माधिकारी, नाशिक यांना याज्ञिक भूषण पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर महाराज देगलूरकर, सद्गुरू प्रसाद महाराज अमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये, मदन महाराज हरदास, वा.ना. उत्पात, केशव महाराज नामदास, अनिल बडवे, बाळशास्त्री हरदास, माधवदास राठी महाराज, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, यादव महाराज, कबीर महाराज, स्थानिक मठाधिपती, संस्थानाधिपती, वारकरी, फडकरी, दिंडी चालक-मालक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राठी महाराज यांनी केल, तर आभार अॅड.देशमुख यांनी व्यक्त केले.
द्विशताब्दी महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 9:41 PM