सागर दुबेजळगाव : नुकतेच दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झालेला आहे़ आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती गुणपत्रकाची़ अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटपाबाबत कुठल्याही सूचना शिक्षण विभागाला प्राप्त झालेले नाही़ तर दुसरीकडे १ आॅगस्टपासून आयटीआय प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया प्रारंभ झाली आहे़ जिल्ह्यात शासकीय व खाजगी आयटीआयमधील १० हजार १६८ जागांसाठी आतापर्यंत जिल्ह्यातून ६ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून त्यातील ६ हजार १३५ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून तो आॅनलाईन जमा केला आहे़काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला आहे़ निकाल लागून दोन आठवडे उलटत आली असली तरी अद्याप दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी हातात मिळणार, याची तारीख अद्याप जाहीर नसल्याने विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनही विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची जमवा-जमव सुरू झालेली आहे़ अकरावी प्रवेश प्रक्रिया ही आॅफलाईन पध्दतीने होणार असल्याचे जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पध्दतीने राबविण्यात सुरूवात झालेली आहे़ १ आॅगस्टपासून ही प्रक्रिया प्रारंभ झालेली आहे़ संबंधित शासकीय व खाजगी आयटीआय महाविद्यालयांनी आपआपल्या संकेतस्थळावर जागा व इतर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे़ तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीच्या प्रवेशाबाबत संकेतस्थळावर नियोजन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना २१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व अर्ज पूर्ण झाल्यानंतर शुल्क जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे.जिल्ह्यात १७ शासकीय आयटीआयजळगाव जिल्ह्यात १७ शासकीय तर ७७ खाजगी अशी एकूण ९४ आयटीआय महाविद्यालये कार्यरत आहेत़ १७ शासकीय आयटीआय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ५६८ तर खाजगी आयटीआय महाविद्यालयांमध्ये ६ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत़ अशा एकूण जिल्ह्यात प्रवेशासाठी १० हजार १६८ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत़६ हजार १३५ विद्यार्थ्यांनी भरले अर्जजिल्ह्यातील १० हजार १६८ प्रवेश जागांसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी (रजिस्टेशन) केले आहे़ त्यापैकी ६ हजार १३५ विद्यार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरून तो सबमिट केला असून त्याच बरोबर त्यातील ५ हजार ९८ विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्मही सबमिट केला आहे़अशी आहे प्रवेश प्रक्रियाविद्यार्थ्यांना २१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व अर्ज पूर्ण झाल्यानंतर शुल्क जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. २ ते २१ आॅगस्टपर्यंत प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्डद्वारे प्रवेश करून सादर करता येणार आहे़ २५ आॅगस्ट रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द होईल व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविले जातील़ २५ व २६ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादीाबाबत हरकती नोंदविण्यासह प्रवेश अर्जात माहिती बदल करता येणार आहे़ २७ आॅगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर होणार आहे़ त्यानंतर ३० आॅगस्टपासून पहिल्या प्रेवश फेरीला सुरूवात होईल़ त्यात व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द होईल़ नंतर ३१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावयाची आहे़ १ ते ५ सप्टेंबर कालावधीत दुसरी फेरी होणार आहे़ १० ते १५ सप्टेंबर दरम्यानात तिसरी तर १९ ते २४ सप्टेंबर या दरम्यानात चौथी प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे़
आयटीआय प्रवेशासाठी ६ हजार ५३५ विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 9:29 PM