जळगाव : जिल्ह्यातील सर्व कुरीअर कंपनी व वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या कुरिअर एजन्सी यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विना नोंदणीकृत माल वाहतूक करणाºया कुरीअर कंपन्या व वैयक्तिक व्यवसाय करणाºया एजन्सींविरूध्द कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.न्यायालयाच्या ३१ जुलै २०१९च्या आदेशान्वये कॅरेज बाय रोड अॅक्ट २००७ अंतर्गत ही नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कुरिअर कंपन्या व वैयक्तिक व्यवसाय करणाºया कुरीअर एजन्सी यांनी तत्काळ शासकीय शुल्काचा भरणा करून कंपन्या नोंदणीकृत करून घेऊन तसे प्रमाणपत्र करुन घ्यावे लागणार आहे. तसे न केल्यास अशा कंपन्या व एजन्सीविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
कुरिअर एजन्सीला नोंदणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 9:56 PM