शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

जळगाव जिल्ह्यातील दप्तर नोंदणी, वसुलीवरून प्रांत, तहसीलदारांवर प्रश्नांची सरबत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:53 PM

दुस-या दिवशीही झाडाझडती

ठळक मुद्देदप्तर तपासणीसाठी पाच उपायुक्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21- शासकीय वसुली व दप्तर नोंदणी का रेंगाळली, त्याचा काय पाठपुरावा केला यासह वेगवेगळ्य़ा  प्रश्नांची सरबत्ती करीत विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी बुधवारी महसूल विभागाचा आढावा घेताना तहसीलदारांची  कानउघडणी केली.  तसेच  प्रांताधिका:यांनी यामध्ये लक्ष देत वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे असल्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान आता कामात सुधारणा करा, मी पुन्हा फेब्रुवारी महिन्यात आढावा घेईल, अशीही तंबी त्यांनी दिल्याचे  सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील महसूल अधिका:यांची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,  वनविभागाचे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त दिलीप स्वामी, उन्मेश महाजन, आरडीसी राहुल मुंडके, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचा आढावा मंगळवारी घेतल्यानंतर महसूल विभागाचाही आढावा तब्बल पाच तास घेण्यात आला. वर्षानुवर्षे दप्तर           तपासले नाहीतलाठय़ांकडे चुकीच्या नोंदी होणे, नोंदी रेंगाळणे यासाठी तलाठय़ांचे दप्तर वेळोवेळी तपासले का, वर्षानुवर्षापासून ते का रेंगाळले अशी विचारणाही आयुक्तांनी केली. माहिती बरोबर का नाही ?आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांनी आढावा घेताना विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तहसीलदारांवर वेगवेगळ्य़ा प्रश्नांची सरबत्ती केली.  आणलेली माहिती पुरेसी नसल्याने त्याविषयी माहिती देता न आल्याने माहिती का नाही, असे प्रश्न आयुक्तांनी केले असता राहून गेल्याचे तहसीलदारांचे म्हणणे होते. त्यावर पुन्हा कसे राहून गेले अशी उलट तपासणी केली असता अधिका:यांची भंबेरी उडाली. वसुलीसाठी काय केले?.. शासकीय वसुली करताना ती का रेंगाळली, वसुलीची टक्केवारी कमी का आहे, वसुली होत नसेल तर संबंधितांना नोटीस दिल्या का अथवा काय प्रयत्न केले, असा जाब आयुक्तांनी तहसीलदारांना विचारण्यात आला. त्यावेळी उपस्थित निरुत्तर झाले.मोबाईल टॉवरची यादी सोबत नाहीवसुलीच्या प्रश्नामध्ये मोबाईल टॉवरची झालेली व  वसुली व थकबाकी सांगण्यात आली. त्यावेळी आयुक्तांनी मोबाईल टॉवरच्या याद्या सांगा, असे सांगताच याद्या नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यावरून आता कामात सुधारणा करा, अशा सूचना संबंधितांना दिल्या.