मुक्ताईनगर: महाविकास आघाडी सरकारचा पहिला मोठा निर्णय म्हणजे २ लाख पर्यंत शेतकºयांना कर्जमाफी दिली. ही माझ्या कारकिर्दीची सुरवात असून आता २ लाखाच्यावर कजमुक्ती तसेच नियमितपणे कर्ज फेडणाºयांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळाव्या प्रसंगी जाहीर केले.ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला त्यांनीच विश्वास दाखवला२५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला. उद्धव हे तू करणार नसेल तर हे होणारच नाही, असे शरद पवार म्हणाले होते म्हणून ही जवाबदारी घेतली. जनतेच्या मनातलं हे सरकार आहे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वाटचाल सुरु आहे.मुक्ताईनगर तालुक्यात वाघाचा आधीवास आहे. वाघ माझ्या अवतीभवती असतात पण चंद्रकांत हुशार वाघ निघाला. तिन्ही पक्षाचे झेंडे त्याने घेत बाजी मारली, असे सांगत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रात व्याघ्र प्रकल्प मागणी पहिल्यांदा पूर्ण करेल तसेच एसटी डेपो लगत व्यापारी संकुलाचा प्रश्नही लवकरच सोडवू हे माझे वचन असल्याचे ठाकरे यांनी संगीतलेखडसेंचे नाव न घेता टिकामुक्ताईनगर आज मुक्त झाले आहे, कशा पासून व कोणा पासून हे तुम्हाला ठाऊक आहे, असे माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली.आॅपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पहा असा समाचार त्यांनी भाजपा नेत्यांचा घेतलामुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हाती घेतलेल्या कामांना साथ देण्याची आमची भूमिका आहे, असेही शरद पवार म्हणाले.
नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:37 PM