जळगाव : डाटा फिडींगच्या कामात तरुणीची ३ लाख ४६ हजार ७०० रुपयात फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात विरेन नितीन बारणे व सरफराज गुलाब अख्तर शेख (रा.सुरत, गुजरात) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. फिर्यादी तरुणीच्या बाबतीत ज्या उपकरणांचा वापर झालेला आहे, ती सर्व उपकरणे संशयितांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दोघांना अटक करणे गरजेचे असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी केला. न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात दोघांनी अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी ३० ऑगस्ट २०१७ रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 8:00 PM