ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 6 - शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून प्राप्त 25 कोटींच्या निधीचा प्रवास लवकरच जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होणार आहे. या निधीतून करण्यात येणा:या कामांच ेपुनर्नियोजन करण्यात आले असून एलईडी पथदिवे, नाल्यांचे मजबुतीकरण व मध्यवर्ती भागात इलेक्ट्रीक केबल भूमिगत केल्या जाणार आहेत. या संदर्भात आठवडाभरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांसमवेत बैठकही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील रस्ते विकासासाठी विकास निधी मिळावा म्हणून जून 2015 मध्ये जिल्हा दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी निवेदन दिले होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी 25 कोटींचा निधी जाहीर केला होता व तो दोन वर्षानंतर प्राप्त झाला व अद्याप ही त्यातून विकास कामांना प्रारंभ झालेला नाही.25 कोटींचा महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झालेला निधी जिल्हा प्रशासनाकडेच आहे. हा निधी साधारणत: पुढील आठवडय़ात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेचच निविदा प्रक्रिया या विभागाकडून सुरू केली जाणार आहे. बांधकाम सोबत होणार बैठकआमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यात कामाच्या नियोजनाबाबत लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत कामांच्या नियोजनावर चर्चा होईल. लवकरात लवकर बैठक व्हावी व त्यात कामांची निश्चिती केल्यानंतर त्यांना प्रारंभ करण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. असा आहे नवा प्रस्तावआता तिसरा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात 10 कोटी रूपये एलईडी पथदिवे बसविण्यासाठी, 5 कोटी नाल्यांना संरक्षण भिंत बांधणे, 5 कोटी मुख्य रस्त्यांवरील विद्युत केबल भूमिगत करणे.यात टॉवर चौक ते बस स्टॅंडपर्यतचा रस्ता प्रस्तावित आहे. उर्वरित पाच कोटीत गटारींची कामे प्रस्तावित करावीत की नाही? यावर चर्चा सुरू आहे. कारण शहरात भूमिगत गटारींची कामे होणार आहेत. त्यात प्रत्येक भागातील गटार ही भूमिगत गटारीस जोडली जाणार आहे. त्यामुळे ही कामे रद्द करून भूमिगत केबलची कामे जास्त करता येतील काय? अशी चर्चा लवकरच करून निर्णय घेतला जाणार आहे.