लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : येथील चोपडा-यावल मार्गावर बेकादेशीर गोवंशाची वाहतूक करताना पोलिसांनी बुधवारी पहाटे केलेल्या कारवाईत पकडण्यात आले आहे. वाहनचालकास अटक करण्यात आली असून, वाहन जप्त करण्यात आले आहे. कत्तलीपूर्वीच गुरांची सुटका करण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार, २३ जूनला पहाटे पाचला यावल शहरातील भुसावळ टी पाॅईटवर कार्यरत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. चोपड्याहून यावलकडे बऱ्हाणपूर अंकलेश्वर राज्य मार्गावरून येणाऱ्या एमएच-४३-बीबी-०४०९ या चार चाकी वाहनाची पोलिसांनी चौकशी करून तपासणी केली. या दोन लाख रुपये किमतीच्या वाहनातून सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचे पाच ते सहा वर्षे वयातील सहा बैल (गोवंश) आढळले. हे गोवंश अत्यंत दाटीवाटीने कोंबून चोपड्याहून सावद्याकडे कत्तलीसाठी नेण्यात येत होते.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनी फिर्याद दिली. त्यावरून वाहनचालक दगडू आनंदा साळुंके (वय ४०, रा. लोहिया नगर, चोपडा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा कलम १९७६ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कलम अधिनियम१९१५चे कलम ५ ( अ ) (ब) तसेच प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याबाबतचे कलम ११ ( ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनचालकासह वाहन ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अजमलखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस अमलदार राहुल चौधरी, पोलीस अमलदार असलमखान, पोलीस वाहनचालक रोहील गणेश यांनी भाग घेतला.