जळगाव: गिरणा काठावरील चाळीसगावसह पाच तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून १४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी रविवार, ४ नोव्हेंबर रोजी दिले. सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी धरणातून हे पाणी सोडले जाणार असून जळगाव तालुक्यात कानळद्यापर्यंत पोहोचण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाचोरा, भडगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणी योजनेचे जलस्त्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी शहरात ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने पिण्यासाठी नपाच्या पाणी योजनेजवळील कच्च्या बंधाºयात गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तर पाचोरा मुख्याधिकारी यांनी शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ ओझर के.टी. वेअरमध्ये गिरणा धरणातून बिगर सिंचन पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. याखेरीज गिरणा काठावरील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या पाणी योजनांसाठीही गिरणातून आवर्तन देण्याची मागणी होत होती.कानळदा पर्यंत सुटणार आवर्तनगिरणा धरणात ८६२४.५० दलघफू (४६.६१टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्या अनुषंगाने गिरणाकाठावरील या सर्व तालुक्यातील पाणी योजनांसाठी अगदी जळगाव तालुक्यातील कानळदा ग्रा.पं.च्या पाणीयोजनेपर्यंत १४०० दलघफू पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी रविवार ४ नोव्हेंबर रोजी दिले. पाणी आवर्तन सोडल्यानंतर पाणी वापर संस्थांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करागिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असून या पाण्याचा वापर पिण्यासाठीच होईल व कोणत्याही परिस्थितीत अपव्यय होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करून दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच गिरणा नदीपात्रातून पाण्याचा उपसा अन्य कारणासाठी होऊ नये, यासाठी नदीकाठचा थ्री-फेज वीजपुरवठा तत्काळ बंद करावा. तसेच संबंधीतांच्या मोटारी, केबल्स आदी साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून सोडण्यात आलेले पाणी लवकरात लवकर कानळद्यापर्यंत पोहोचू शकेल,असे आदेश जिल्हाधिकाºयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहेत.कारवाईसाठी भरारी पथकेचाळीसगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव प्रांताधिकाºयांना नदीपात्रातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून पाणी चोरी रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या भरारी पथकांमध्ये पाटबंधारे विभाग, महसूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामीण पोलीस या विभागांतील संबंधीत अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
गिरणा धरणातून पिण्यासाठी १४०० दलघफू पाण्याचे आवर्तन सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 7:44 PM
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ठळक मुद्दे कानळद्यापर्यंत येण्यास लागणार ३ दिवस अनधिकृत उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करा कारवाईसाठी भरारी पथके